आरोग्य उत्तम राहावे यासाठी व्यक्तीने किमान 7 ते 8 तासांची झोप घ्यायला हवी, असा सल्ला डॉक्टर कायम देतात. पण, अनेकदा असे होते की, रात्रभर झोपूनही दिवसा सुद्धा झोप येते. म्हणजेच तुम्ही कितीही झोपलात तरी तुमची झोप पूर्ण होत नाही. आपल्या आजूबाजूस असे कोणी आळस देणारे दिसलं की, आपण सहज त्याला आळशी बोलून मोकळे होतो. पण यामागे झोपेचा आजार असू शकतो. सतत येणारी झोप हायपरसोमनियाच्या आजाराचे लक्षण असू शकते
हायपरसोमनिया म्हणजे काय ?
हायपरसोम्निया हा एक झोपेशी संबंधित आजार आहे. हायपरसोमनिया आजारात रात्री चांगली झोप झाल्यानंतरही दिवसा सतत झोप येते. एका अभ्यासानुसार, सुमारे 40% लोकांना हायपरसोमनियाची लक्षणे दिसतात. हायपरसोमनियाग्रस्त व्यक्ती इतक्या गाढ झोपेत असते की, असे वाटेल की तो व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आहे. पण, हा हायपरसोमनिया होण्यामागे अनेक कारणे देखील आहेत.
हायपरसोमनियाची कारणे –
- अल्कोहोल किंवा ड्रग्सचे जास्त प्रमाणात सेवन
- हायपोथायरॉईडीझम, अस्थमा यामुळेही हायपरसोमनिया होऊ शकतो.
- शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तुम्हाला सतत झोप येते. परिणामी, दिवसभर जांभई येणे सुरु होते.
- हार्मोनल बदलांमुळेही जास्त झोप येऊ शकते.
- चहा – कॉफीचे सेवन केल्यास रात्री झोप येण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, तुम्हाला सकाळी झोप येते.
हायपरसोमनिया लक्षणे –
- सतत थकल्यासारखे वाटणे
- भूक न लागणे
- कोणत्याही कामात लक्ष एकाग्र न होणे
- सतत चिडचिड होणे
झोप घालविण्यासाठी उपाय –
- कॉफी घालावयाची असेल तर कॉफी पिणे सर्वात सोपा उपाय मानला जातो.
- शरीर हायड्रेट ठेवा. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
- व्यायाम करा. व्यायामाने सुस्ती निघून जाईलच शिवाय शरीरही तंदुरुस्त होईल.
- सतत झोप येण्याची समस्या जाणवत असेल तर कोमट पाण्याने अंघोळ करा. कोमट पाण्याने अंघोळ करणे हा झोप
- घालविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
हेही पाहा : Tips For Weight Loss : वेट लॉससाठी या पिठाच्या पोळ्या ठरतात फायदेशीर
Edited By – Chaitali Shinde