Wednesday, March 19, 2025
HomeमानिनीHealthIce Apple : उन्हाळ्यात ताडगोळा खाण्याचे अगणित फायदे

Ice Apple : उन्हाळ्यात ताडगोळा खाण्याचे अगणित फायदे

Subscribe

उन्हाळा सुरू होताच बाजारात पांढऱ्या रंगाची पाणीदार असणारे ताडगोळे दिसू लागतात. Ice Apple या नावाने हे फळ ओळखले जाते. ताडगोळे अतिशय मऊ आणि रसदार असतात. त्याच्यावरील साल अतिशय जाड असते. त्यामुळे त्यावरील साल काढणे खूप कंटाळवाणे काम असते. असे असले तरी ताडगोळे थंड असल्याने उन्हाळ्यात आवर्जून खावीत असे सांगितले जाते. याशिवाय ताडगोळे चवीला अतिशय गोड असतात. ताडगोळ्यामध्ये खनिज, आयर्न, लोह,पोटॅशियम, व्हिटॅमिन्स आदी पोषकतत्वे आढळतात. त्यामुळे उन्हाळ्यातील उष्णता वाढू लागली की, ताडगोळ्याची मागणी वाढू लागते. चला तर मग जाणून घेऊयात, उन्हाळ्यात ताडगोळा खाण्याचे फायदे

ताडगोळा खाण्याचे फायदे –

  1. ताडगोळे चवदार आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी समजले जातात.
  2. ताडगोळे थंड असल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर असतात.
  3. ताडगोळ्याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी मदत मिळते. कारण यात व्हिटॅमिन सी आढळते.
  4. उन्हाळ्यात डिहाड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी ताडगोळे अवश्य खावेत. यातील पाणी शरीराला हायड्रेट तर ठेवतेच शिवाय थंडही ठेवते.
  5. बद्धकोष्ठता, पोट फुगणे, जळजळ अशा समस्या सुरू असतील तर ताडगोळ्याचे सेवन करावे.
  6. ताडगोळा हे अत्यंत कमी कॅलरी असणारे फळ आहे. या कारणामुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी हे फळ अतिशय गुणकारी ठरते. तुम्हाला डायबिटीसची समस्या असेल तर ताडगोळे खायला हवेत.
  7. 100 ग्रॅम ताडगोळ्यात 40 ग्रॅम कॅलरी आढळतात. त्यामुळे ताडगोळा खाल्लास पोट लवकर भरते. याशिवाय ताडगोळे पाणीदार असल्याने जास्त भूक लागत नाही आणि वेट लॉस होण्यास मदत मिळते.
  8. उलट्यांचा त्रास असल्यास ताडगोळा खावा. हा एक सोपा आणि घरगुती उपाय सांगितला जातो.
  9. पोटात जंत झाले असतील तर ताडगोळा खाऊ शकता. यातील पोटॅशियम लिव्हर टॉनिकप्रमाणे काम करते.
  10. उन्हाळ्यात त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या सामान्य आहे. अशावेळी ताडगोळा खाल्याने समस्येपासून आराम मिळतो.

 

 

 

 

 

हेही पाहा –

Manini