Friday, September 29, 2023
घर मानिनी Kitchen Ice Cream Recipe : मुलांसाठी घरीच बनवा हेल्दी 'ग्रेप्स आईस्क्रिम'

Ice Cream Recipe : मुलांसाठी घरीच बनवा हेल्दी ‘ग्रेप्स आईस्क्रिम’

Subscribe

आपल्यापैकी अनेकांना जेवल्यानंतर आईस्क्रिम खायची सवय असते. कोणताही ऋतू असो अगदी पावसाळा असला तरी अनेकांच्या आईस्क्रीम म्हटलं का तोंडाला पाणी सुटतं. मात्र, दररोज बाजारातील आईस्क्रिम खाणं शरीरासाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी तयार करता येणाऱ्या ग्रेप्स आईस्क्रिमची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :

  • 500 ग्रॅम द्राक्षे
  • 500 ग्रॅम दही
  • 1 कप साखर
  • 1/2 कप दुध पावडर
  • 1/2 चमचा लिंबाचा रस
  • 1/4 कप क्रिम

कृती :

Grape Sorbet Recipe | Black Grapes Sorbet Recipe

  • प्रथम द्राक्षे धुऊन मिक्सरमधून पल्प तयार करुन तो गाळून घ्या.
  • त्यानंतर दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवा.
  • पाणी निथळून गेलेले दही कपड्यातून काढा आणि त्यात पिठीसाखर, दुधाची पावडर, लिंबाचा रस आणि द्राक्षांचा पल्प घालून सेट होण्यास ठेवा.
  • 3 तासांनी अर्धवट झालेले आइस्क्रीम बाहेर काढा आणि मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • त्यानंतर पुन्हा एकदा आईस्क्रीम सेट होण्यास ठेवा आणि सर्व्ह करताना द्राक्षे लावून ते सजवा.
  • अशाप्रकारे घरच्या घरी ‘ग्रेप्स आईस्क्रीम’ सहज तयार करुन शकता.
- Advertisement -

 

 


- Advertisement -

हेही वाचा :

 

Noodles Recipe : मुलांसाठी बनवा ज्वारीचे पौष्टिक नूडल्स

- Advertisment -

Manini