Sunday, March 16, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : डाएट नाही तर, या सिक्रेट हॅकने वजन त्वरित होईल...

Health Tips : डाएट नाही तर, या सिक्रेट हॅकने वजन त्वरित होईल कमी

Subscribe

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या वाईट सवयीमुळे वजन त्वरित वाढते आणि कमी देखील होत नाही. बऱ्याचदा डाएट करून सुद्धा वजन कमी होत नाही. किंवा काही काळासाठी कमी होते, नंतर पुन्हा वाढते. वजन कमी न होण्याच मुख्य कारण म्हणजे, बहुतेक लोकांना असे वाटते की वजन कमी करण्यासाठी, सर्वप्रथम त्यांना त्यांचे आवडते अन्न आणि पेय सोडावे लागेल आणि जिममध्ये तासनतास घाम गाळावा लागेल. असा विचार करून आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते पुढे ढकलण्यासाठी नवनवीन कारणे शोधताे. आज आपण जाणून घेऊयात डाएट नाही तर, कोणत्या सिक्रेट हॅकने वजन त्वरित कमी होईल.

बऱ्याचदा आपण वजन कमी करण्यासाठी आपल्या आवडीचे अन्न आणि पेय यांचा त्याग करतो, तासंतास जिम करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? हे सर्व करण्याची आवशक्यता नसते. आहारतज्ञांच्या मते, जर तुम्ही तुमच्या आवडीच्या पदार्थांचे सेवन मर्यादित केले तसेच नियमित काही तास वर्कआउट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही निश्चय केलं तर तुमचं वजन त्वरित कमी होईल.

सिक्रेट हॅकर्स 

  • आहारतज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमचं स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे.
  • तुम्ही कोणत्याही पदार्थाचं सेवन मर्यादित करा.
  • ज्या पदार्थांच सेवन करतं असाल, ते तुमच्या भुकेपेक्षा थोडे कमी सेवन करा.
  • तसेच बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळावे.
  • वजन कमी करण्यासाठी साखरयुक्त पदार्थांचा आणि रिफाइंड तेलांचा देखील पूर्णपणे त्याग करा .
  • जेवण हे मोहरीच्या तेलात करावे.
  • दुधासोबत चहा पिण्याऐवजी रोज सकाळी रिकाम्या पोटी फैट बर्निंग चहाचे सेवन करा.
  • याव्यतिरिक्त, नियमित किमान 4 लिटर पाण्याचे सेवन करा.
  • दररोज 10 हजार पावले चाला.
  • सुरुवातीला 1,000 पावले चालण्यापासून सुरुवात करा आणि नंतर ती हळूहळू वाढवा.
  • जर तुम्हाला सकाळी चालता येत नसेल तर संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर चाला.

आहारतज्ञांनी सांगितलेल्या, या सिक्रेट हॅक्सचे फॉलो केल्याने तुम्ही सहजपणे काही महिन्यात वजन कमी करू शकाल.

हेही वाचा : Hair Care Tips : निरोगी केसांसाठी वापरा हे घरगुती शॅम्पू


Edited By : Prachi Manjrekar

Manini