घरलाईफस्टाईलमुलींना कमी वयात पीरियड्स आल्याने उंची खुंटते का?

मुलींना कमी वयात पीरियड्स आल्याने उंची खुंटते का?

Subscribe

महिलांना येणाऱ्या मासिक पाळीबद्दल अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात फार पुर्वी पासून रुजू झाल्या आहेत. तसेच आजकाल कमी वयातील मुलींना लवकर मासिक पाळी आल्याने त्यांची वाढ खुंटते अशी शंका काही पालकांच्या तेसच मुलींच्या मनात उपस्थित होते. पालकांच्या मते मुलीला जर कमी वयात पीरियड्स आले असतील तर तिची उंची वाढण्याची शक्यता फार कमी आहे. डॉक्टरांच्या मते पहिल्यांदा पीरियड्स येतात तेव्हा याला मेनार्क असे बोलण्यात येते. 2018 साली एनसीबीआय च्या आभ्यासानुसार 13 किंवा 11 वर्षाच्या मुलींना पहिल्यांदा पीरियड्स येण्यास सुरूवात होते. पण त्यांची उंची वाढणे याबाबत डॉक्टरांनी देखील काहीश्या प्रमाणात खरं असल्याचं मान्य केलं आहे.पण डॉक्टरांच्या मते उंची न वाढणे हे 100टक्के खरं नसून याला काही अपवाद देखील आहेत.

सरोजीनी नायडू मेडिकल कॉलेजमधील प्रोफेसर डॉ निधी यांच्या मते, मुलींना कमी वयात पीरियड्स आल्यानंतर उंची खुंटते असा तर्क मांडण्यात येतो या मागे फिजियोलॉजी कारण आहे. यामुळे शरिरातील एस्ट्रोजन हार्मोनवर परिणाम होते.तसेच लंग बोन एंन्डमधील कार्टिलेजवर एका प्रकारे सॉफ्ट टिश्यूने तयार झालेले असताता यामध्ये कॅल्शिफाई आढळून येत नाही. अनेकदा एस्ट्रोजनचं एंन्डला कॅल्शिफाई करणे थांबवते. शरिरात एस्ट्रोजन हार्मोन तयार झाल्यास याची चिंता अधिक वाढू लागते आणि याचा परिणाम शरिराच्या उंचीवर होऊ शकतो.
लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज दिल्लीमधील प्रोफेसर डॉ.मंजू पुरी यांच्या मते, जर पालकांची उंची जास्त असले तर याचा फायदा मुलींना पीरियड्स आल्यानंतर देखील होऊ शकतो. तसेच आई वडिलांना मुलींच्या वाढीवर लक्ष देणे गरजेचं आहे. त्याच्यांवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडल्यास याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच उंचीवर देखील होऊ शकतो.

- Advertisement -

हे हि वाचा-Morning Drinks: आलिया भट्ट पासून ते अनुष्का शर्मा ‘या’ हेल्दी ड्रिंक पासून करतात दिवसाची सुरुवात

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -