अनेकजण घरात कुत्रा, मांजर हे पाळीव प्राणी आवडीने पाळतात. शिवाय त्यांचं खाणं-पिणं, आवड-निवड या सगळ्याची मनापासून काळजी घेतात. अनेकदा आपल्या पाळीव प्राण्याला आवडत नसलेली गोष्टी घरामध्ये पूर्णपणे वर्ज्य केल्या जातात. जर तुम्ही देखील असेच श्वान प्रेमी असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर, घरामध्ये विविध रोपटी लावणं सर्वांनाच आवडतं. पण काही वनस्पती लावणं तुमच्या श्वानासाठी घातक ठरु शकतं.
घरात पाळीव कुत्रा असेल तर लावू नका ‘ही’ रोपटी
- ट्यूलिप
ट्यूलिप फुलांचे रोपटे दिसायला कितीही सुंदर असले तरीही हे तुमच्या श्वानासाठी विषारी ठरू शकतात. त्यामुळे हे घरात कधीही लावू नका.
- कोरफड
कोरफड एक औषधी वनस्पती असून ही मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु अनेक पोषक घटकांव्यतिरिक्त, त्यात सॅपोनिन आणि अँथ्राक्विनोन हे दोन घटक असतात, जे कुत्र्यांसाठी विषारी असतात.
- जास्वंद
जास्वंदीच्या फुलांचा वापर देवपूजेमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे हे रोपटं अनेकांच्या घरात असते. पण श्वानासाठी हे घातक आहे, त्यामुळे या वनस्पतीपासून त्याला नेहमी दूर ठेवा
- स्नॅक प्लांट
स्नॅक प्लांट ही खूप सुंदर वनस्पती आहे, अनेकजण घराच्या लिव्हिंग रूममध्ये हे रोप ठेवतात. पण जर तुमच्या घरात पाळीव कुत्रा असेल तर तो रोपापासून दूर ठेवा. कारण त्यात सॅपोनिन असते, ही पाने चुकून कुत्र्याने खाल्ल्यानंतर त्याला उलट्या होऊ शकतात.