Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Summer Travel Tips : 'या' गोष्टी तुम्हाला माहीतच हव्यात

Summer Travel Tips : ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीतच हव्यात

Subscribe

उन्हाळ्यात वाढत्या उकाड्यामुळे शरिरातील पाणी हे घामावाटे बाहेर पडते.

तुम्ही उन्हाळ्यात (Summer) ट्रेनमधून लांबचा प्रवास करणार असाल, मग वेकेशन (summer vacation), बिजनेस ट्रिप (Business Trip) किंवा अन्य काही कारणास्तव तुम्ही लांबचा प्रवास करणार असाल. तर काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, उन्हाळ्यात ट्रेनमध्ये वैद्यकीय मदत तिची जास्त गरज भासते. जास्त करून प्रवाशांना उलटी, अतिसार आणि पोट दुखणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

उन्हाळ्यात वाढत्या उकाड्यामुळे शरिरातील पाणी (water) हे घामावाटे बाहेर पडते. यामुळे शरिरातील तापमान नियंत्रित ठेवणारे थर्मोस्टेट सिस्टम योग्य काम करत नाही. यामुळे ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, उल्टी, अतिसार, डोके दुखी, सतत तहान लागणे, अशक्तपणा सारखी लक्षणे, ब्लड प्रेशर कमी होणे आणि हृदयविकाराचा झटका समस्या होण्याची दाट शक्यता असते.

- Advertisement -

ट्रेनने प्रवास करताना ‘या’ गोष्टी लक्ष्यात ठेवा

 • दूषित पाणी आणि कापलेली फळे पोटात संसर्ग पसरवतात, त्यामुळे ते खाणे टाळा.
 • प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरील विक्रेत्यांकडून पाण्याची बॉटल विकत घेताना, ती पाण्याची बॉटल सीलबंद आहे की नाही यांची खातरजमा करावी.
 • शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. यासाठी पाण्यासोबत दूध, ताक किंवा लस्सी प्यायला तुमच्यासोबत ठेवा. तुम्ही ताज्या फळांचा रस देखील तुमच्यासोबत ठेवू शकता.
 • कडक उन्ह आणि उष्ण वाऱ्यापासून स्वत: ला सरक्षित ठेवण्यासाठी तोंडावर कापड बांधवे.
 • समोसा, बर्गर किंवा अन्य जंक फूटचे सेव कमी करावे.
- Advertisement -

ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी ‘या’ तयारी करा

 • कमी अंतराच्या प्रवासासाठी घरातून पाणी घेऊन जा.
 • प्रवास करताना बाहेरचे अन्न खाऊ नये. घरी बनवलेले पदार्थ खावे.
 • इलेक्ट्रोलाइट किंवा ओआरएस पॅकेट तुम्ही तुमच्यासोबत ठेवा.
 • उलट्या आणि लूज मोशनचे औषध तुमच्यासोबत ठेवा.
 • प्रवासादरम्यान आरामदायक आणि सैल कपडे घालावी.
 • एक लिटर पाण्यात ओआरएस मिसळा आणि तासाभरात पूर्ण करा

हेही वाचा – तुम्ही उंच असाल तर ‘या’ स्टाइलिंग टीप्स करा फॉलो
- Advertisment -