तुम्हाला कधी घराची चावी, कधी मोबाईल तर कधी मुलांचे वही-पेन कुठेतरी ठेवल्यानंतर ते नक्की कुठे ठेवलेत हे आठवत नाही, काही वेळापूर्वी , दिवसांपूर्वी भेटलेल्या व्यक्तीचं नाव चेहरा आता आठवत नाही असं जर तुमच्याबरोबर होत असेल तर सावध व्हा. कारण तुमच्या या विसराळूपणाचं कारण आहे मानसिक ताण आणि मानसिक थकवा. कारण सततच्या टेन्शनमुळे तुमच्या मेंदूवर ताण येत असून टिश्यूही प्रभावित होतो. परिणामी त्याचा परिणाम तुमच्या स्मणशक्तीवर होतो . अशावेळी मेंदूला सक्रीय ठेवण्यासाठी पुरेशा झोपेची आणि योग्य आहाराची सर्वाधिक गरज असते. त्याचबरोबर मेंदूशी संबंधित व्यायाम केल्याने त्याची कार्यक्षमताही वाढते. त्यासाठी काही ठराविक व्यायाम करावे.
- एरोबिक्स
ज्यावेळी तुम्ही एरोबिक्स करता त्यावेळी तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवाचादेखील व्यायाम होत असतो.
त्यामुळे रक्तभिसरणही वेगात होत असल्याने शरीरभर ऑक्सिजन सुरळीत पोहचते. एरोबिक्स नियमित केल्यास मेंदूतील क्षीण झालेल्या टिश्यूंनाही ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहचते. त्यामुळे स्मरणशक्तीही सुधारते.
- ब्रेन गेम खेळा
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मेंदूला चालना देणारे गेम खेळावेत. यात शब्दकोडी, बुद्धीबळ,बोर्ड गेम यासारख्या गेमचा समावेश करावा. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
- प्राणायाम
प्राणायाम म्हणजेच श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे. या व्यायामामुळे फुफ्फुस तर निरोगी राहतेच शिवाय मेंदूवर मनावर आलेला ताणही कमी होतो.
- नृत्य
नाचणे हा फीटनेससाठी बेस्ट व्यायाम आहे. नाचल्यामुळे मूड फ्रेश तर होतोच शिवाय मेंदूही सक्रिय होतो. ताणतणाव गायब होतो. हॅपी हार्मेोन्स सक्रिय होतात. स्मरणशक्ती वाढते.
हेही वाचा :