ब्युटी इंडस्ट्री वेगाने बदलत चालली आहे. या इंडस्ट्रीमध्ये दररोज काहीतरी नवे पहायला मिळत आहे. मेकअप संदर्भातील अशा काही गोष्टी आपण पाहतो की, आपल्याला त्याची भुरळ पडते. मात्र सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे आणि स्किन टेक्सचरमुळे चेहऱ्यावर मेकअप लावल्यानंतर थोड्यावेळाने ब्युटी प्रोडक्ट्स एका ठिकाणी जमा होऊ लागतात आणि मेकअप मधील लूक बिघडला जातो. असे घाम येत असल्यामुळे होते.
यामागे काही कारणे असू शकतात. फ्लॉलेस मेकअप लूक हवा असेल तर तो बिघडू नये म्हणून पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवल्या पाहिजेत.
चेहऱ्यावर ब्लोटिंग पेपरचा वापर केल्याने काय होते?
घाम आल्यानंतर त्वचा तेलकट होऊ लागते आणि चेहऱ्यातून निघणारे तेल आपण व्यवस्थितीत पुसत नाही. कारण आपल्याला भीती वाटते की, केलेला मेकअप निघून जाईल. अशातच तुम्ही चेहऱ्यावरील घाम पुसण्यासाठी ब्लोटिंग पेपरचा वापर करू शकता.
मॅट मेकअप प्रोडक्ट्सचा वापर
उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते. यावेळी खुप घाम येणे सहाजिकच आहे. अशातच तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये थोडा बदल करू शकता. यासाठई ड्युई बेस्ड मेकअप प्रोडक्ट्सऐवजी मॅट मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करू शकता. या प्रोडक्ट्समध्ये कोणत्याही प्रकारचे तेल नसते.
मेकअप पावडरचा वापर
चेहऱ्यावर आपण लिक्विड आणि क्रिम मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करू शकता. उन्हाळा आणि स्किन टेक्सचरच्या कारणास्तव हे प्रोडक्ट्स त्वचेवर जमा होऊ लागतात. यासाठी तुम्ही एखादे मॅट प्रोडक्ट्सचा वापर करून सेट करू शकता. यासाठी सेटिंग पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करू शकता.