खूप सोप्पंय! ‘या’ टिप्स वापरा आणि मऊ इडली बनवा

मऊ आणि टेस्टी इडली बनविताना जर का तुम्ही 'या' टिप्सचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल. काय आहेत 'या' टिप्स जाणून घ्या.

पावसाळा(monsoon) सुरु झाला की काही न काही गरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. इडली हा असाच एक पदार्थ आहे की जो जगभरात प्रसिद्ध आहे. इडली हा पदार्थ प्रामुख्याने दक्षिण भारतातील(south indian food) असला तरीही जगभर खाल्ला जातो. प्रत्येकाच्याच घरी सकाळच्या नाश्त्यासाठी इडलीला(idli) प्राधान्य दिलं जातं. पण काहीं मऊ आणि लुसलुशीत इडली बनवताना काही गोष्टी कठीण जातात. मऊ आणि टेस्टी इडली बनविताना जर का तुम्ही ‘या’ टिप्सचा(tips) वापर केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल. काय आहेत ‘या’ टिप्स जाणून घ्या.

हे ही वाचा –  नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

कोणताही पदार्थ करत असताना त्या पदार्थाचं साहित्य जर का योग्य प्रमाणात घेतलं तर ते नक्कीच उपयोगी पडू शकतं. त्याचबरोबर योग्य साहित्या सोबत योग्य कृती असेल तर कोणताही पदार्थ नक्कीच उत्तम होऊ शकतो.

हे ही वाचा – ना जिम ना वर्क आऊट, फक्त फिस्ट डाएटने करा ‘वेट लॉस’

साहित्य :

४ कप उडीद डाळ, ८ कप इडलीचे तांदूळ, २ चमचे मीठ, खाद्य तेल आणि पाणी याच सोबत तुम्ही २ कप उडीद डाळ आणि २ कप मूग डाळ देखील घेऊ शकता.

हे ही वाचा – दुर्मीळ, चविष्ट आणि हेल्दी पावसाळी रानभाज्या

अशी करा इडली :

डाळ आणि तंडुलो स्वच्छ धुवून ते वेगवेगळ्या भांडयात भिजत ठेवा. डाळ आणि तांदूळ किमान ८ तास भाजू द्यावे. त्या नंतर ते बारीक वाटून रात्रभर ठेवावे. हे मिश्रण रात्रभर त्याहेवल्याने ते आंबट होते. आणि त्यात असे पोषक घटक तयार होतात जे आपली शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. हे मिश्रण आंबविण्याची प्रक्रिया किमान १२ तास करावी.

हे ही वाचा – कॉफी आणि व्यक्तिमत्त्व, काय आहे नातं? जाणून घ्या…

हे मिश्रण व्यवस्थित आंबवून झाल्या नंतर सकाळी त्या मध्ये २ चमचे मीठ घाला. त्या नंतर इडलीचे साचे घेऊन त्याला तेल लावून त्यात मिश्रण भरा. आणि त्या नंतर इडली पात्र घेऊन त्यात ते ठेऊन इडल्या वाफवून घ्या.


हे ही वाचा – Banana Benefits : कोणत्याही हंगामात एक ‘केळे’ खाण्याचे आहेत अनेक फायदे

काही वेळाने इडली वाफवून झाली की गॅस बंद करा. काही वेळ इडलीचे भांडे तसेच राहू द्या त्या नंतर भांडे उघडून गरम गरम इडल्या तुम्ही चटणी किंवा सांबार सोबत खाऊ शकता.

टिप्स :

– इडली करताना डाळ आणि तांदूळ किमान ८ तास तरी भिजू द्यावेत.

– तांदूळ आणि डाळ यांचे मिश्रण किमान १२ तास आंबवून ठेवावे.

– मिश्रण आंबवून ठेवताना ते व्यवस्थित एकजीव करावे.

– मिश्रण एकजीव करून जेव्हा आंबविण्यासाठी ठेवताना त्यात मीठ घालु नये कारण मीठ घालून रात्रभर मिश्रण ठेवल्यास त्याला पाणी सुटेल. इडल्या
करण्यापूर्वी त्यात मीठ घालावे.

– त्याच सोबत डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये वाटताना त्यात शक्यतो कोमट पाण्याचा वापर करावा.