Saturday, December 2, 2023
घरमानिनीBeautyथंडीत स्किन ड्राय झाल्यास करा 'हा' छोटा उपाय

थंडीत स्किन ड्राय झाल्यास करा ‘हा’ छोटा उपाय

Subscribe

हिवाळा अनेकांचा आवडता ऋतू असला तरी थंडीमुळे अनेकांची त्वचा अधिक कोरडी होते. अशावेळी मार्केटमधील बऱ्याच केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेला हानी देखील पोहोचते. मात्र यावर घरगुती उपाय केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

थंडीत करा ‘हे’ उपाय

38 Home Remedies To Get Rid Of Dry Skin On The Face

- Advertisement -
  • कोरड्या त्वचेसाठी हळद, बेसन, लिंबाचा रस आणि मध एकत्र करुन हा पॅक चेहऱ्याला लावावा. यामुळे कोरडेपणा कमी होतो.
  • काही व्यक्तींची ऑईली किंवा ड्राय स्किन असते. अशाव्यक्तीने मुलतानी माती, मध आणि दही यांचा वापर करुन फेसपॅक तयार करुन चेहऱ्याला लावल्याने त्वचा थंडीतही चांगली राहते.
  • लिंबाच्या रसात एरेंडेल तेल समप्रमाणत मिक्स करुन त्याचे चेहऱ्याला मालिश करुन चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्यावा.
  • पपईचा गर चेहऱ्याला लावून चेहरा अर्ध्या तासाने धुऊन घ्यावा यामुळे त्वचा चमकदार बनते.

H2O Pure Blue | 10 Home Remedies For Dry Skin

  • मधात लिंबाचा रस मिसळून हा पॅक चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
  • टोमॅटो, गाजर आणि काकडीचा रस सम प्रमाणात घेऊन हा पॅक चेहऱ्याला लावल्याने चेहरा अधिक खुलून दिसतो.
  • रात्री झोपताना लिंबाचा रस, गुलाब पाणी आणि ग्लिसरीन लावून झोपल्यास चेहरा नितळ होतो.
  • दुधात 2 बदाम भिजवून त्याची साल काढून वाटून घ्यावी आणि त्यात थोडंसं संत्र्याचा रस घालून हात, पाय आणि चेहऱ्याला लावून चेहरा सुकल्यानंतर धुऊन घ्यावा.

हेही वाचा :

चेहऱ्यावर दालचिनी लावताना घ्या खबरदारी

- Advertisment -

Manini