पावसाळा उन्हापासून कितीही दिलासादायक देणारा असला तरी आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला मानला जात नाही. पावसाळा येतो तो अनेक आजारांना सोबत घेऊनच. या ऋतूत सततच्या बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे तुम्हाला विविध इन्फेक्शन शुद्ध शकतात. अशा वातावरण तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करू शकता. जेणेकरून तुम्ही आजारांपासून दूर राहू शकाल.
तुळस आणि काळी मिरी –
साहित्य –
- 2 कप पाणी
- 1 टीस्पून काळी मिरी
- 1 टीस्पून आले
- गूळ
- 1 टीस्पून देशी तूप
- 1-2 लवंगा, तुळशीची पाने
कृती –
- भांड्यात तूप गरम करून घ्या. त्यात लवंग, बारीक केलेली काळी मिरी, आले आणि तुळशीची पाने मिक्स करा.
- मसाले चांगले परतून झाल्यावर त्यात पाणी आणि गूळ मिक्स करा.
- आता हे मिश्रण मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटे शिजवावे.
- यानंतर गाळून त्याचा काढा करून पिऊन घ्यावा.
हेही पाहा : Monsoon 2024 : पहिल्या पावसात भिजायचं की नाही?
आल्याचा काढा –
साहित्य –
- 1 इंच आले
- तुळशीची 10 – 12 पाने
- 2 ते 3 काळी मिरी
- 1/4 टीस्पून जिरे
- हळद
- मध
- 1 टीस्पून लिंबाचा रस
कृती –
- एका भांड्यात 1 ग्लास पाणी टाकून उकळवून घ्यावे.
- यात आले, तुळस, काळी मिरी, जिरे आणि हळद टाकून पुन्हा चांगले उकळवून घ्या.
- आता काढा गाळून घ्यावा.
- नंतर यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करा.
दालचिनी –
साहित्य –
- 1/2 टीस्पून आले पावडर,
- 1/2 टीस्पून बडीशेप
- 1/2 टीस्पून दालचिनी पावडर
- 1 लवंग
- 2 कप पाणी
कृती
- दालचिनीचा काढा तयार करण्यासाठी भांड्यात २ कप पाणी टाकून गरम करून घ्यावे.
- आता त्यात सर्व साहित्य घालून 10 मिनिटे उकळू द्या.
- पाणी अर्धे होईपर्यंत काढा उकळवून घ्यावा.
एक गोष्ट लक्षात घ्या, काढा हा कायम गरामागरमच प्यावा. वरील काढे सर्दी, खोकला आणि वायरल इन्फेक्शन पासून बचाव होऊ शकतो.
Edited By – Chaitali Shinde