Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी डायबिटीजच्या रुग्णांनी आंबा खाताना लक्षात ठेवा 'या' महत्त्वाचा गोष्टी

डायबिटीजच्या रुग्णांनी आंबा खाताना लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाचा गोष्टी

डायबिडीज असलेल्या रुग्णांच्या आरोग्यासाठी बऱ्याचवेळा धोकादायक ठरु शकते

Related Story

- Advertisement -

आंब्याच्या मोसमात आंबे खाण्याची मज्जा काही ओरच आहे. आंब्यात अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. मात्र आंबा खाणे हे डायबिडीज असलेल्या रुग्णांच्या आरोग्यासाठी बऱ्याचवेळा धोकादायक ठरु शकते. आंब्यात असलेल्या साखरेमुळे डायबिटीजच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. मग डायबिटिज असलेल्या रुग्णांनी आंबा खाऊच नये का? तर असे नाही डायबिटज असलेले रुग्ण देखील काही प्रमाणात आंबा खाऊ शकतात. हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार डायबिटीज असलेल्या रुग्णांनी किती प्रमाणात आंबा खावा आणि आंबा खाताना कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या. (important things to diabetics patients eat mango)

- Advertisement -

आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स आणि मिनिरल्स असतात. जे शरीरातील ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी मदत करतात. एक कप कापलेल्या आंब्यात ९९ टक्के कॅलरी, १.४ ग्रॅम प्रोटीन, २५ ग्रॅम कार्बन,२२.५ ग्रॅम शुगर त्याचबरोबर व्हिटिमिन्स, कॅल्शिअम,झिंक, आयर्न आणि मॅग्नीशिअम असते.

- Advertisement -

आंब्यातील ९० टक्क्यांहून अधिक कॅलरीज त्यांच्या गोडपणातून येते. यामुळे बायबिटजच्या रुग्णांची शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता असते. तर आंब्यात असणारे फायबर आणि एंटिऑक्सीडेंट ब्लड शुगर लेव्हर कमी करण्यास देखील मदत करतात.

कोणतेही फळ खाताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक फळाला आपले शरीर वेगवगळी प्रतिक्रिया देते. आंब्यात हेल्दी कार्बन्स असतात मात्र तरीही डायबिटिज असणाऱ्या रुग्णांनी आंबा खाताना एक लिमिट ठेवणे महत्त्वाचे आहे. डायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी आपल्या डाएटमध्ये योग्य प्रमाणात आंब्याचा समावेश करावा.

आंब्यात मोठ्या प्रमाणात फायबरचे प्रमाण असते. मात्र प्रोटीनची मात्र कमी असते. प्रोटीन ब्लड शुगर लेव्हर कमी करते. आंब्यासोबतच डायबिटीज असलेले रुग्ण उकडेलेली अंडी,चीज ही खाऊ शकतात.


हेही वाचा – बीट पासून बनवा टेस्टी हलवा

 

 

- Advertisement -