प्रत्येकाची इच्छा असते की, स्वत:चे घर असावे. यासाठी दिवसरात्र मेहनत घेण्यात येते. पण, नवीन घरी शिफ्ट होणं तस सोप्प काम नाही. काही वेळा नवीन घरी शिफ्ट होणं तणावाचं कारण बनू शकते. पण, तुम्ही जर योग्य नियोजन करून नव्या घरी शिफ्ट झालात तर हे डोकेदुखीच काम ठरणार नाही. त्यामुळे जाणून घेऊयात, नवीन घरात शिफ्ट होण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायल्या हव्यात,
- नवीन घरी जाण्यापूर्वी सर्व गरजेचे पेपर आहेत ना याची खात्री करावी. यात लिज करार, खरेदी करार यांचा समावेश असतो.
- नवीन घरी शिफ्ट होण्यापूर्वी पाणी, गॅस यांचे कनेक्शन सूरू झाले की नाही याची खात्री करावी. यामुळे शिफ्ट झाल्यावर कोणतीही गैरसोय होणार नाही.
- नव्या घरी शिफ्ट होण्यापूर्वी घरात कोणत्या फर्निचरची आवश्यकता आहे, घराचा रंग, पडदे कसे असावेत. घर मालकाने सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी पुरवल्या आहेत का नाही ते तपासावेत.
- नव्या घरी शिफ्ट होण्यापूर्वी जुन्या घरातील कोणतं फर्निचर तुम्ही घेऊन जाणार आहात याची लिस्ट करावी.
- नव्या घरी शिफ्ट होताना रंगकाम, बांधकाम पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ती कामे पूर्ण करून घ्यावीत.
- नव्या घरी शिफ्ट होताना पॅकर्स आणि मुव्हर्स कंपन्याचे कोटेशन घ्यावे. कोणती कंपनी तुम्हाला नक्की कोणत्या सुविधा देणार आहेत याचा नीट विचार करून कंपनी निवडावी.
- शिफ्टींग करताना काचेच्या वस्तू आणि नाजूक सामानासाठी एंजन्सीकडे कोणत्या सुविधा आहेत, याची माहिती आधीच घ्यावी. जेणेकरून सामानाचं नुकसान होणार नाही.
- नवीन घरी शिफ्ट झाल्यावर सर्वात पहिले काम आहे ते म्हणजे दाराचं कुलूप बदलणे. कारण जुन्या मालकाकडे घराची किल्ली असू शकते, जे भविष्यात जोखीमीचं ठरू शकते.
- नव्या घराला सेफ्टी डोअर, खिडक्या सेफ आहेत का नाही? याची खात्री करावी.
- नवीन घरी गेल्यावर तुमचा पत्ता बदलण्यास विसरू नये. महत्वाची कागदपत्रे जसे की, बॅंक, रेशन कार्ड, आधार कार्डवरील पत्ता बदलावा. जुन्याच घराचा पत्ता सर्वत्र असेल तर कायदेशीर व्यवहार करणे कठीण होऊ शकते.
- नव्या घरी गेल्यावर शेजाऱ्यांशी मैत्री करावी. अडचणीच्या वेळेस नातेवाईकांआधी शेजारीच धावून येतात.
हेही पाहा –