आजच्या युगात सोशल मीडियाला जास्त प्राधान्य दिले जाते . आपल्या जीवनाचा हा अविभाज्य भाग बनला आहे. बरेच लोक सोशल मीडियावर खूप वेळ घालवतात. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर देखील होतो. सोशल मीडियाच्या सातत्याने वापरामुळे तणाव, नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे आणि एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते. बऱ्याचदा बरेच लोक सोशल मीडियावर आपल्या दैनंदिन घडामोडी शेअर करत असतात. हे सर्व बघून इतरांच्या मनात आपण कुठे मागे राहतो याची भावना निर्माण होऊ लागते अशाने ताण अजून वाढू लागतो. आज आपण जाणून घेऊयात मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सोशल मीडियापासून कसे दूर राहावे.
ठरावीक वेळ ठेवा
दिवसातून फक्त ठरावीक वेळ सोशल मीडिया वापरण्याचा नियम करा.स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी फोनवरील नोटिफिकेशन किंवा तुम्ही काही सेटिंग करून देखील सोशल मीडिया कमी वेळ वापरू शकता.
सोशल मीडियापासून ब्रेक घ्या
आपण बऱ्याचदा सोशल मीडियावर बराच वेळ घालवतो अनेक वेळा आपल्याला कळत देखील नाही किती वेळ झाला आहे. अशावेळी तुम्ही आठवड्यातून किमान एक दिवस पूर्णपणे सोशल मीडियापासून ब्रेक घेऊ शकता. या ब्रेकमुळे तुम्हाला खूप हलके वाटेल.
खऱ्या नातेसंबंधांवर भर द्या
बऱ्याचदा आपण आपल्या मित्रमंडळींशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधतो. यामुळे आपलं त्यांच्याशी प्रत्यक्षात असं भेटणं होत नाही. सोशल मीडियावर बरेच लोक खोटे नातेसंबंध निर्माण करतात अशा नातेसंबंधांपासून दूर राहा.
तुलना करणे टाळा
हा सर्वात महत्वाचा भाग आहे. बऱ्याचदा आपण आपली तुलना इतरांशी करतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टी वास्तव असतातच असे नाही.स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या आणि सकारात्मक गोष्टींवर भर द्या.
मेडिटेशन आणि व्यायाम करा
ध्यानधारणा, योगासने आणि शारीरिक व्यायाम मन शांत ठेवण्यास मदत करतात.यामुळे आपले मन आनंदी राहते.
माहितीपूर्ण आणि सकारात्मक कॉन्टेन्ट
सोशल मीडियावर अनेक कॉन्टेन्ट असतात. आपण जे कॉन्टेन्ट निवडतो तेच आपल्याला वारंवार दिसतात त्यामुळे सकारात्मक कॉन्टेन्ट पाहा. असे कॉन्टेन्ट फॉलो करा तुम्हाला सकारात्मक वाटेल आणि माहिती देखील मिळेल.
अशाप्रकारे तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहून देखील आनंदी राहू शकता.
हेही वाचा : Health Tips : शुगरचं सेवन केल्याने एंग्झायटी ट्रिगर होते का ?
Edited By : Prachi Manjrekar