Thursday, April 11, 2024
घरमानिनीKitchenMango Raita : उन्हाळयात घरी करा आंब्याचे रायते

Mango Raita : उन्हाळयात घरी करा आंब्याचे रायते

Subscribe
उन्हाळ्यात कैरी किंवा आंबा सहज मिळाणारे फळ आहे. कैरी किंवा आंबा नुसता खायला चांगला लागतोच पण त्यापासून तयार केलेल विविध पदार्थ देखील तितकेच चांगले लागतात. आंब्याचे रायते हा पदार्थ गावाकडे जास्त बनवला जातो. तसेच सासम आणि रायते हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. रायत्यामध्ये शक्यतो रायवळ आंबा वापरतात.

चला तर मग जाणून घेऊया आंब्याचे रायते कसे करावे-

साहित्य-
  • ५-७ रायवळ आंबे घ्या
  • आंबे स्वच्छ धुवून सोलून घ्या,यासोबत साली पण भिजत घाला
  • अर्ध्या आंब्याचा रस काढा
  • अर्धे अख्खे आंबे ठेवा.
  • ओलं खोबरं १ वाटी,
  • सुक्या मिरच्या (प्रमाणानुसार)
  • मेथी दाणे, २-४
  • हळद,गुळ, मीठ (प्रमाणानुसार)
  • हवी तर थोडीशी चिंच

फोडणीचे साहित्य – मोहरी, हिंग, कढीपत्ता

- Advertisement -

Ambyache Raite | झटपट आंब्याचे रायते | Mango Raita - YouTube

कृती-
  • भिजत घातलेल्या साली पाण्यात पिळून घ्या.
  • त्यात सोललेले अख्खे आंबे, त्याचा रस एकत्र करा.
  • सुक्या मिरच्या किंचित कोरड्या भाजून घ्या. तसेच ओलं खोबरं, हळद, गूळ हे मिश्रण मिक्सरला लावा.
  • यानंतर आंब्याच्या रसात हे मिश्रण घाला तसेच यामध्ये चवीनुसार मीठ घाला.
  • हे झाल्यावर एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, मेथी दाणे घालून त्यावर आंबा रस (खोबरं वाटप लावलेला) ओता.
  • शेवटी हळद घालून एक उकळी काढा.
  • आंब्याचे रायते तयार सर्व्ह करण्यास तयार आहे.

हेही वाचा :

 

- Advertisment -

Manini