घरलाईफस्टाईलपावसाळ्यात ट्राय करा हेल्दी आणि चविष्ठ मुग डाळ दलिया रेसिपी

पावसाळ्यात ट्राय करा हेल्दी आणि चविष्ठ मुग डाळ दलिया रेसिपी

Subscribe

 

पावसाळा आला की  तळलेल्या भज्या, मसालेदार पदार्थ,  बणवण्याची रेलचेल घरामध्ये सरु होते. परिणामी खोकला,ॲसिडीटी,सर्दी,ताप यासारखा त्रास होण्यास सुरूवात होते. तसेच या तेलकट,तुपकट पदार्थांमुळे लठ्ठपणा देखील वाढू लागतो. लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी लोक विविध फंडा वापरत असतात. मात्र पावसाच्या दिवसांत लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध टिप्स वापरण्यापेक्षा एखादा चविष्ठ, खमंग तसेच आरोग्यास उपायकारक अशा पदार्थांचा आहारात समावेश करुन प्रत्येक जण आपल्या जिभेचे चोचले देखील पुरवू शकतो. दलिया हा एक पौष्टिक आहार आहे. फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर दलिया रात्रीजेवणासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते. अनेक लोकांना दलियाचे नाव ऐकताच डोक्यावर आठ्या पडण्यास सरुवात होते. पण आज आम्ही तुम्हांला दलिया पासून तयार होणारी एक चविष्ठ रेसिपी सांगणार आहोत. यामागचे कारण आहे की तुमचे आरोग्यही उत्तम राहील तसेच तुमच्या जेवणाची व जिभेचे चोचले देखील पुर्ण होतील. यासाठी पुढील रेसिपी ट्राय करुन तुम्ही चविष्ठ अशी मुग डाळ दलिया बनवू शकताता

- Advertisement -

मुग डाळीचा दलिया बणवण्यासाठी तुम्हाला आर्धी वाटी दलिया आणि आर्धी वाटी मुग डाळ 1 तास पाण्यात भिजवून ठेवावी लागेल. त्यानंतर याला स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेणे.

कृती-

प्रेशर कुकरमध्ये तेल तापवत ठेवा. यामध्ये हींग,जीरा,सुकलेल्या लाल मिर्च्या,राई टाका. यानंतर कुकरमध्ये बारिक कांदा कापून टाका. कांदा लाल होईपर्यंत परतवा. कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो कापून टाका. पुढे लाल मिर्ची पावडर, हळद, मीठ योग्य प्रमाणात टाका.तसेच तुमच्या आवडीनुसार यात मटर, फ्लावर, गाजर सारख्या भाज्या तुम्ही टाकू शकतात. मॅगी मसला टाकल्यास दलिया आणखी चविष्ठ बनू शकतो. यानंतर संपुर्ण मिश्रण एकजीव करुन यात पाणी टाकून कुकरचे झाकण घट्ट लावून घ्या. तसेच दोन ते तीन शीटी नंतर कुकर थंड झाल्यावर कुकर मधील दलिया एका बाऊल मध्ये भरुन सर्व करा.

- Advertisement -

हे हि वाचा – महिलांनो चाळीशीनंतर करा ‘या’ टेस्ट

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -