घरताज्या घडामोडीउत्तम आरोग्यासाठी आहारात करा 'या' Black Foodsचा समावेश

उत्तम आरोग्यासाठी आहारात करा ‘या’ Black Foodsचा समावेश

Subscribe

Black Foods कॅन्सर,डायबिटीज,हार्ट अटॅक सारख्या आजारांपासून वाचण्यासाठी मोठी मदत होते.

उत्तम आरोग्यासाठी लहानपणापासूनच पौष्टिक, हेल्दी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या भाज्या, फळे, दूध यांसारख्या पदार्थांचा आपल्या आहारात नेहमीच समावेश असतो. आपल्या आहारात काही Black Foodsदेखील समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. आपल्याकडे बऱ्याचदा काळा रंग हा अशुभ मानला जातो. मात्र काळे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरु शकतात. कॅन्सर,डायबिटीज,हार्ट अटॅक सारख्या आजारांपासून वाचण्यासाठी मोठी मदत होते. पोषक तत्वे असलेले ते Black Foodsकोणते आहेत जाणून घ्या. (Include Black Foods in your diet for better health)

 

- Advertisement -

ब्लॅक बेरी

ब्लॅक बेरीचे सेवेन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्लॅक बेरीच्या सेवनामुळे हदयाचे स्वास्थ व्यवस्थित राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराला येणारी सुज देखील कमी करण्यास मदत होते इम्यूनिटी मजबूत होण्यासाठीही मोठी मदत होते. महिलांची मासिक पाळी सुरळीत होण्यास मदत होते. ब्लॅक बेरी स्मूदी,सलाड, डेजर्ट सोबत खाणे फायदेशीर ठरते.

- Advertisement -

 

काळी द्राक्षे

 


लाल द्राक्षांच्या तुलनेत काळ्या द्राक्षांमध्ये अधिक एंटीऑक्सीडेंट असतात. काळ्या द्राक्षांचे सेवन केल्याने कॅन्सर,डायबेटीज, अल्जाइमर आणि हदय रोगासारख्या रोगांपासून बचाव होतो. आजारपणातून लवकर बरे होण्यासाठी काळी द्राक्षे मदत करतात.

काळे तीळ

 

भारतात मोठ्या प्रमाणात काळ्या तिळाचे सेवन केले जाते. काळ्या तिळात सॅचुकेटिड फॅट्स,मोनोअनसॅचुरेटीड,कॅल्शिअम आणि मॅग्निशिअमचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे कार्डियोवस्कुलर,हाय ब्लड प्रेशर सारख्या आजारांपासून बचाव होतो. काळ्या तिळांच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न,कॅपर,मॅग्ननीज ऑक्सिजनच्या सर्कुलेशन आणि मेटोबॉलिक रेट कंट्रोल होते.

काळे अंजीर

काळे अंजीर चवीला अत्यंत स्वादिष्ट असतात. काळ्या अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबर असते. अंजीरच्या सेवनामुळे पचन क्रिया सुरळीत राहते. अंजीर खाल्ल्याने वजन देखील कमी होण्यास मदत होते. काळ्या अंजीरमध्ये असलेले विशेष घटक कॅन्सरसोबत लढण्यासाठी मोठी मदत होते.

काळे तांदुळ

काळे तांदुळ गव्हापेक्षाही पौष्टिक असतात. काळ्या तांदुळाचा भात स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे. काळ्या तांदुळामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सिडेंट असते. काळे तांदुळ डायबिटीज आणि कॅन्सपासून आपला बचाव करतात.


हेही वाचा – घरी बनवा व्हेज चीज फ्रँकी

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -