Monday, March 17, 2025
HomeमानिनीHealth Tips : मूड बूस्ट करण्यासाठी डाएटमध्ये करा केशरचा समावेश

Health Tips : मूड बूस्ट करण्यासाठी डाएटमध्ये करा केशरचा समावेश

Subscribe

केशर हा एक मसाला आहे. जो आपण सर्वजण वर्षानुवर्षे आपल्या स्वयंपाकघरात वापरत आहोत. केशराचा वापर अनेकदा अन्नाचा रंग आणि चव सुधारण्यासाठी केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? केशरचा उपयोग मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील केला जातो.केशरमध्ये असलेली क्रोसिन आणि सॅफ्रानल ही संयुगे मूड सुधारण्यास मदत करतात.मानसिक आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम होतो.जर तुम्हाला अनेकदा दुःख किंवा ताण येत असेल, तर केशर खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल

तणाव कमी करते

केशर खाल्याने मानसिक ताण कमी होतो.नैसर्गिकरित्या ताण कमी करण्यासाठी केशरचे सेवन केले जाऊ शकते. एवढेच नाही तर ते तणाव संप्रेरक म्हणजेच कॉर्टिसोल नियंत्रित करण्यास देखील मदत करते, जे मूड स्विंग्स व्यवस्थापित करण्यास मदत करते.

झोप चांगली येते

जर तुम्हाला सारखे मूड स्विंग्स होत असतील तर यामागचं कारण म्हणजे झोपेचा अभाव असू शकते. जेव्हा तुमची रात्री नीट झोप होत नसेल तेव्हा जास्त चिडचिड होते. पण केशर मज्जासंस्था शांत करून आणि मेलाटोनिनची पातळी वाढवून तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करू शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केशरयुक्त दूध पिण्याची सवय लावा.

मूड सुधारण्यास मदत मिळते

केशर खाल्ल्याने तुमच्या शरीरात चांगले वाटणारे रसायने वाढतात, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो. केशरमध्ये क्रोसिन, क्रोसेटिन आणि सॅफ्रानल सारखे बायोएक्टिव्ह संयुगे असतात, जे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्हाला आनंदी आणि आरामदायी वाटते. जर सेरोटोनिनची पातळी कमी असेल तर तुम्हाला दुःख, ताण, चिंता किंवा नैराश्य येऊ शकते.

ऑक्सिडेटिव्ह ताण मॅनेज करते

शरीरात फ्री रेडिकल्समुळे ऑक्सीडेटिव स्ट्रेस वाढू लागतो. त्यामुळॆ थकवा चिडचिड नैराश्य इत्यादी समस्या वाढू लागतात. अशा परिस्थितीत, आहारात केशरचा समावेश करणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो. केशरमध्ये असलेले उच्च अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात, ज्यामुळे तुमचा मूड अधिक स्थिर राहतो.

हेही वाचा : Menstrual Hygeine : मासिक पाळीदरम्यान अशी राखा शरीराची स्वच्छता


Edited By : Prachi Manjrekar

Manini