मेनाेपाॅज दरम्यान हार्मोन्समध्ये अनेक बदल हाेत असतात. या काळात आपल्या आराेग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. याेग्य आहार अत्यंत महत्तवाचा असताे. मेनाेपाॅज दरम्यान शरीरातील एस्ट्राेजनची पातळी घटते, ज्यामुळे हाडांची झीज, मूड स्विंग्स, शरीरातील ऊर्जा कमी हाेणे यांसारख्या समस्या उभ्दवू लागतात. त्यामुळे अशावेळी याेग्य आहार घेणे गरजेच आहे. आज आपण जाणून घेऊयात मेनाेपाॅज दरम्यान आहारात काेणत्या पदार्थांचा समावेश करू शकताे.
कॅल्शियम आाणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ
तुम्ही तुमच्या आहारात दूध, दही पनीर यांचा समावेश करू शकता. याने तुमची हाड मजबूत हाेऊ शकतात. बदाम अक्राेड आणि तीळ यामध्ये माेठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. जर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता असेल तर तुम्ही सूर्यप्रकाशात वेळ घालवू शकता.
फायबरयुक्त पदार्थ
तुम्ही ओट्स, ब्राउन राइस इत्यादींचा समावेश करू शकता या पदर्थांनी पचनसंस्था सुधारते. डाळी, चणे, राजमा, मसूर आणि फायबर दाेन्ही मिळतात. याने पाेषन आाणि चयापचय सुधारते.
हार्मोन्स संतुलित करणारे पदार्थ
तुम्ही आहारात साेया आणि साेयाबीन यांचा समावेश करू शकता. बियाणे हे हॉर्मोनल हेल्थ सुधारते.
भरपूर पाणी प्या
मेनाेपाॅज दरम्यान आपल्या हार्मोन्समध्ये अनेक बदल हाेत असतात. अशावेळी शरीर हायड्रेटेड राहणे अत्यंत गरजेचं आहे. हर्बल टी ग्रीन टी, कॅमोमाईल टी हे डिटॉक्ससाठी उपयुक्त आहे.
हे पदार्थ टाळा
- जास्त साखर आणि प्राेसेस्ड फूडमुळे लठ्ठपणा वाढताे.
- हॉर्मोनल असंतुलन आणि हॉट फ्लॅश वाढवू शकतात
- योग्य आहारासोबत हलका व्यायाम, ध्यानधारणा आणि चांगली झोप घेतल्यास मेनोपॉजच्या त्रासांवर चांगला परिणाम दिसून येतो.
हेही वाचा : मानेच्या दुखण्याचं कारण तुमची उशी तर नाही ना ?
Edited By : Prachi Manjrekar