बऱ्याच लोकांना वजन कमी करणे हा एक टास्क वाटतो. बदलत्या जीवनशैलीमुळे, आपल्या खाण्याच्या काही सवयींमुळे आपले वजन त्वरित वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. डाएट किंवा व्यायाम करून देखील आपल्याला योग्य रिजल्ट मिळत नाही. डाएट आणि व्यायामसह आपला आहार देखील महत्वाचा भाग आहे. बऱ्याचदा आपण डाएट आणि व्यायामाकडे लक्ष देतो. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार असणे गरजेचं आहे. आज आपण जाणून घेऊयात, वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकतो.
फळे आणि भाज्या
वजन कमी करण्यासाठी आहारात फळे सफरचंद, केळी, संत्री, डाळिंब इत्यादींचा समावेश करा. कमी साखर असलेली फळांच सेवन करा.
भाज्या
भाज्या पालक, ब्रोकली, गाजर, फुलकोबी, मिरच्या, आणि कोशिंबिरीसाठी हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करा.
प्रथिनेयुक्त पदार्थ
प्रथिनेयुक्त पदार्थ म्हणजे, अंडी, कोंबडीचं मांस कमी असलेल्या पदार्थाचं तुम्ही सेवन करू शकता .
ग्रीन टी आणि औषधी पेय
वजन कमी करणे अवडघड असते. त्यामुळे तुम्ही औषधी पेयांच्या मदतीने तुमचं वजन कमी करू शकता. ग्रीन टी, आले-पाण्याचा काढा, हर्बल टी इत्यादी
पाणी भरपूर प्या
वजन त्वरित कमी करण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी देखील पिऊ शकता. पाणी प्यायल्याने आपले वजन लगेच कमी होते.
बीन्स आणि शेंगा
बीन्स आणि इतर शेंगा जसे की मसूर, काळे बीन्स आणि राजमा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
ब्रोकोली आणि फ्लॉवर
ब्रोकोली, फ्लॉवर आणि कोबी या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
अंडी
तुम्हाला आश्चर्य वाटेल. अंडी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अंड्यांमध्ये कोलीन आणि व्हिटॅमिन डी सारखी पोषक तत्त्वे असतात. अंडी खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने तुमचं वजन लगेच कमी होईल
हेही वाचा : Weight Loss Tips : झिरो फिगरसाठी ट्राय करा या इनडोअर एक्सरसाइज
Edited By : Prachi Manjrekar