Monday, January 20, 2025
HomeमानिनीHealth Tips : निरोगी राहण्यासाठी डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

Health Tips : निरोगी राहण्यासाठी डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

Subscribe

आजकालच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे तसेच खाण्याच्या वाईट सवयींमुळे आपण लगेच आजारी पडताे. आपल्याला कोणतेही आजार सहजपणे होऊ लागतात. जर आपण निरोगी असलो तर आपण सहसा आजारी पडत नाही . निरोगी राहण्यासाठी व्यायामासह आपल्या आहाराकडे देखील लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण व्यायाम करून देखील निरोगी नसतो. यामागचं कारण म्हणजे आपला आहार. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात, निरोगी राहण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकतो.

डाएट कसं असावं

  • आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट् असलेले पदार्थांचा समावेश करा.
  • भात, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स इत्यादी पदार्थ शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते.
  • जास्त प्रथिने असलेले पदार्थांचा समावेश करा

निरोगी राहण्यासाठी डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश

फळे आणि भाज्या

पालक, मेथी, कोथिंबीर, मुळा पालक, गाजर, बीट, टोमॅटो, भोपळा आणि शिमला मिरची तर फळांमध्ये सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, डाळिंब, पेरू.इत्यादींचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करू शकता.

प्रथिनयुक्त पदार्थ 

जास्त प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा, या पदार्थांमुळे आपण नेहमी निरोगी राहतो. डाळी आणि कडधान्ये: मूग, चणे, तूर डाळ, मसूर तसेच पनीर आणि दही अंडी हे पदार्थ आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते.

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थांमुळे आपल्याला कोणतेही आजार होत नाही, आपण आजारी देखील पडत नाही. दूध, लोणी, ताक, आणि चीज या पदार्थांच सेवन तुम्ही मर्यादित करू शकता.

पाणी आणि सूप

दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच सूप किंवा डिटॉक्स वॉटरही उपयुक्त आहे.

अशाप्रकारे तुम्ही निरोगी राहण्यासाठी डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करू शकता.

हेही वाचा :  Protein : या भाज्यांमध्ये आहे भरपूर प्रोटीन


Edited By : Prachi Manjrekar

Manini