हिवाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये अनेक प्रकारची फळे येतात. या फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असते . परंतु हिवाळ्यात आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते अशावेळी असे काही फळे असतात ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. जे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. या फळांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपण निरोगी आणि उत्साही राहतो. आज आपण जाणून घेऊयात, हिवाळयात डाएटमध्ये कोणत्या फळांचा समावेश करू शकतो.
पेरू
पेरूमध्ये भरपूर प्रोटीन असते. यामध्ये फायबर्स आणि व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपली पचनक्रिया आणि प्रतिकारशक्ती देखील वाढते . त्यामुळे तुम्ही डाएटमध्ये पेरू या फळांचा समावेश करू शकता.
किवी
किवीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्चे गुणधर्म आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी चांगले असते. तसेच या फळामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
खजूर
हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीर उबदार राहते, ज्यामुळे थंडीपासून बचाव होतो. यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात आढळतात, जे ऊर्जा वाढवण्यासाठी आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी उपयुक्त आहेत.
एवोकॅडो
एवोकॅडोमध्ये प्रथिने आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असते .ज्यामुळे हृदय निरोगी ठेवण्याचे आणि हिवाळ्यात ऊर्जा देण्याचे काम करते. एवोकॅडो हे फळ डाएटसाठी उत्तम आहे. बरेच लोक डाएटमध्ये या फळाचा समावेश करतात.
संत्री
संत्रींमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि प्रोटीन असते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. हे शरीर हायड्रेट करायला देखील मदत करते.
सफरचंद
सफरचंदात प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
या फळांचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करू शकता.
हेही वाचा : Teeth : चहामुळे दातांवर काय परिणाम होतो?
Edited By : Prachi Manjrekar