घर लाईफस्टाईल आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश केस होतील लांबसडक

आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश केस होतील लांबसडक

Subscribe

हल्ली सगळेजण सुंदर,मजबूत आणि काळे केस होण्यासाठी नियमितपणे केस धुतात, कंडिशन करतात आणि तेल देखील लावतात. पण बरेचजण त्यांच्या खाण्या-पिण्याकडे योग्य लक्ष देत नाहीत. आणि अशामुळे केसांचे सौंदर्य कुठेतरी हरवून जाते. तसेच तुमच्या आहाराचा तुमच्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतच असतो. महत्वाचे म्हणजे शरीरातील प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, ओमेगा-3 फॅटी अॅसिड इत्यादींच्या कमतरतेमुळे केस लगेच खराब होतात.

अशातच सुंदर केसांसाठी काय करावे? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. तसेच आहारात खालील खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास तुमचे केस निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होऊ शकतात. कोणते आहेत ‘हे’ पदार्थ जाणून घेऊया…

  • केसांच्या वाढीसाठी प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात.
  • कारण केसांची रचना, वाढ आणि मजबुतीसाठी प्रथिने आवश्यक असतात.
  • चांगल्या पदार्थांपासून प्रथिने मिळविण्यासाठी, मखना, शेंगदाणे, सोयाबीन, मसूर, चणे, दही, अंडी, टोफू, मांस, धणे-पुदिना आणि चीज खा.
  • ओमेगा-३ फॅटी अॅसिड हे केसांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर असून यामधले घटक केसांसाठी खूप गरजेचे आहेत.
  • ओमेगा-३ फॅटी अॅसिड केस गळणे कमी करू शकतात तसेच त्यांना मजबूत देखील करू शकतात.
- Advertisement -

50 Foods That Are Super Healthy

  • अशातच ओमेगा-३ फॅटी अॅसिड हे तीळ, फ्लेक्ससीड, बटर, मासे आणि अक्रोडमध्ये आढळतात, जे केसांना नैसर्गिक चमक देतात.
  • मजबूत केसांसाठी लोह देखील महत्वाचे आहे.
  • रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊन केस गळण्याचे प्रमाण वाढते.
  • व्हिटॅमिन ई मजबूत आणि निरोगी केसांसाठी महत्वाचे आहे.
  • कारण यामध्ये एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे जे केसांना हार्श रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करतात.
  • केस घट्ट होण्यास आणि त्यांची चमक टिकवून ठेवण्यास व्हिटॅमिन ई मदत करू शकतात.
  • व्हिटॅमिन ई हे काजू, बदाम, शेंगदाणे, सोयाबीन आणि तीळ तेलात आढळते.
  • त्यामुळे याचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : केसांना नारळाचे दूध लावताना ‘या’ टिप्स फॉलो करा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -