अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केले आहे. जर आपण 75,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन जोडली तर 12.75 लाख रुपयांपर्यंतचे एकूण उत्पन्न नोकरदारांसाठी करमुक्त असेल. नवीन कर प्रणालीनुसार, 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न अजूनही 10 टक्के कर स्लॅबमध्ये येते. यामुळे, करदात्यांना त्यांचे 12.75 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त कसे असेल याबद्दल गोंधळ आहे. आजच्या लेखातून हे सविस्तरपणे समजून घेऊयात.
नवीन कर प्रणालीमध्ये किती कर आकारला जातो?
सध्या, नवीन कर प्रणालीनुसार, 0 ते 4 लाख रुपयांवर कर शून्य आहे. त्याच वेळी, 4 ते 8 लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के आणि 8 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर आकारला जातो. 24 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर सर्वाधिक 30 टक्के कर आकारला जाईल.
12.75 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त कसे असेल?
करदात्यांना आयकर कलम 87A अंतर्गत कर सवलत मिळते. जुन्या कर व्यवस्थेसाठी ही सवलत 12500 रुपये आणि नवीन कर व्यवस्थेसाठी 60000 रुपये आहे. याचा सरळ अर्थ असा की जर नवीन कर प्रणालीमध्ये तुमची कर देयता 60 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक रुपयाही कर भरण्याची आवश्यकता नाही. यानुसार, तुमचे 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल. 0-4 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त आहे. तर, 4 ते 8 लाख रुपयांवर 5% शुल्क आकारले जाईल. याचा अर्थ असा की या 4 लाख रुपयांवरील तुमची कर देयता 20,000 रुपये असेल. पुढील चार लाखांवर, म्हणजेच 8 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंत, 40,000 रुपये म्हणजे 10 टक्के कर भरावा लागेल. याचा अर्थ असा की तुम्हाला 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 60 हजार रुपये कर भरावा लागेल, ज्यावर सरकार थेट सूट देत आहे. जर आपण यामध्ये 75000 रुपयांची मानक वजावट जोडली तर 12,75000 रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होईल.
कर सवलतीचा लाभ कसा मिळवायचा ?
कलम 87ए अंतर्गत कर सवलतीचा दावा करण्यासाठी तुम्हाला आयकर रिटर्न (ITR) दाखल करावे लागेल. तुमचा आयटीआर क्लिअर झाल्यानंतर, रिबेटचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील.
कोणत्या उत्पन्नावर रिबेट लागू असेल?
मासिक पगार
एफडी
व्यवसायातून होणारा नफा
डेट फंडमधून होणारं उत्पन्न
डिव्हिडंड उत्पन्न
भाडं
कोणत्या रकमेवर रिबेट लागू नसेल?
इक्विटी फंडातील गुंतवणूक
शेअर्स
घराच्या विक्रीतून होणारं उत्पन्न
उपलब्ध माहितीनुसार घर, जमिनीची खरेदी आणि विक्री, म्युच्युअल फंडमधील नफा यांच्यावर कर आकारला जाईल. तर, गेमिंग शो मधील कमाई, घोड्यांच्या शर्यतींवर लावलेला रकमेतून होणारा नफा, लॉटरी अशा पैशांवर 30 टक्के कर आकारला जाईल.
हेही वाचा : Beauty Tips : कोरियन ग्लास स्किनसाठी मध फायदेशीर