Wednesday, February 12, 2025
HomeमानिनीParenting Tips : वाचलेलं मुलांच्या लक्षात राहात नाही?

Parenting Tips : वाचलेलं मुलांच्या लक्षात राहात नाही?

Subscribe

जानेवारी महिना मुलांना टेन्शन देणारा असतो. साधारणपणे या महिन्यापासून मुलांच्या परिक्षेचा काळ सुरू होतो. त्यामुळेजानेवारी ते मार्च ते एप्रिल हा काळ मुलांसोबत पालकांच्या परिक्षेचा काळ असतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. काही मुलांची आकलन शक्ती खूप चांगली असते तर काहींना काहीही आणि कितीही प्रयन्त केले तरी केलेले पाठांतर लक्षात राहात नाही. अशा पालकांसाठी मुलांचा अभ्यास घेणे मोठे कठीण काम असू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुलांची स्मरणशक्ती कशी वाढवायची? याबद्द्ल सोप्या टिप्स सांगणार आहोत.

आहाराने वाढेल स्मरणशक्ती – 

मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे. कारण काही पदार्थ मुलांच्या मेंदूला चालना देऊ शकतात. असे पदार्थ खाल्ल्याने मेंदूच्या विकासाला चालना मिळते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

आहारात द्यावेत पुढील पदार्थ –

  • अंड्यांमध्ये कोलीन असते. कोलीनमुळे मेंदूच्या विकासाला चालना मिळते आणि ज्यामुळे मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी मदत मिळते.
  • ब्राउन राइस, गव्हाचा आहारात समावेश करावा. या पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आढळतात, जे मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर असतात.
  • हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. या भाज्यांच्या सेवनाने मुलांची स्मरणशक्ती वाढते. मुलांच्या आहारात पालक, ब्रोकोली, भाज्यांचे सॅलेड यांचा समावेश करावा.
  • दूध आणि दही मुलांना खायला द्यावे. दुधातील कॅल्शियम, प्रोटीन मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

खालील उपाय करता येतील –

  • बऱ्याचवेळा मुलांना वाचन, पाठांतर करणे कंटाळवाणे वाटते. अशावेळी तुम्ही अभ्यासातील काही गोष्टी कवितेच्या लयबंधतेत शिकवू शकता. या ट्रिकमुळे मुलांच्या अभ्यास लक्षात राहू शकतो.
  • शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित ठिकाणे, प्राणी संग्रहालय अशा ठिकाणी मुलांना घेऊन जावे. प्रत्यक्षात पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी मुलांच्या लवकर लक्षात राहतात.
  • पालकांनी मुलांशी नीट, शांतपणे बोलून त्यांची दररोज रिव्हिजन घ्यावी.

 

 

 

 

 

हेही पाहा –

Manini