आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपला जास्त वेळ हा ऑफिसमध्ये किंवा स्क्रीनसमोर घालवतो. त्यामुळे आपण प्राेडक्टिव्ह असं काही करत नाही. प्राेडक्टिव्ह नसल्यामुळे याचा परिणाम थेट आपल्या कार्यक्षमतेवर होतो. जर तुम्ही एक नियमित फिटनेस रूटीन फॉलो केल्याने मानसिक ताण कमी करू शकता. आज आपण जाणून घेऊयात फिटनेस रुटीन फॉलो केल्याने कसं प्राेडक्टिव्हिटी वाढवू शकते.
एनर्जी लेवल बूस्ट होते
जेव्हा तुम्ही नियमित व्यायाम करतात तेव्हा तुम्हाला कमी थकवा जाणवतो. तुमच्या उर्जेवरही सकारात्मक परिणाम होतो. एका संशोधनातून असे आढळून आले नियमित व्यायाम केल्याने कॉफी पेक्षा ऊर्जा शरीराला मिळते. जेव्हा तुम्ही व्यायाम करतात तेव्हा तुमचे शरीर एंडोर्फिन सोडते आणि रक्ताभिसरण चांगले होते.
ताण कमी होतो
बऱ्याचदा आपण दैनंदिन दिनक्रमामुळे थकतो. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुम्हाला हा थकवा जाणवणार नाही. ताण कमी करण्यास देखील मदत होते. जर्नल ऑफ ऑक्युपेशनल अँड एन्व्हायर्नमेंटल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मानसिक आजार आणि थकवा कमी होतो. तुम्ही वजन उचलणे धावणे नृत्य किंवा पळण्याने स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलची पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला अधिक आराम मिळतो.
मूड चांगला राहतो
फिजिकल एक्टिविटी केल्याने आपला मूड चांगला राहतो. एका संशोधनातून असे आढळून आले आहे जे लोक दररोज व्यायाम करतात. त्यांचा कामाचा ताण कमी होतो. ते त्यांच्या कामात अधिक समाधानी असतात. जेव्हा तुम्ही चांगल्या मूडमध्ये आणि आनंदी असता तेव्हा तुम्हाला कामात अधिक प्रेरणा आणि सकारात्मकता जाणवते.
फाेकस राहतो
आपण जे काम करतो त्या कामात प्रगती मिळण्यासाठी तुमचं फाेकस असणे तितकेच गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्ही चांगलं फॉक्स करू शकता. यामागचं कारण म्हणजे व्यायामामुळे रक्तप्रवाह वाढतो.
अशाप्रकारे तुम्ही फिटनेस रुटीन फॉलो करून प्राेडक्टिव्हिटी वाढवू शकता.
हेही वाचा : Health Tips : अँक्झायटी दूर करण्यासाठी सोपे उपाय
Edited By : Prachi Manjrekar
.