Independence Day 2022 : भारतीय महिला आणि त्यांचे सुप्रसिद्ध ब्रँड

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भारतीय महिलांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी स्वतःचा वेगळा ब्रँड तयार करून त्याला एक वेगळी ओळख दिली.

यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरातच उत्सहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येत आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ यांसारखे उपक्रम सुद्धा देशभरात राबविण्यात येत आहेत. भारत हा एक प्रगतिशील देश आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारताचे नाव सन्मानाने आणि आदराने घेतले जाते. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, विज्ञान त्याच बरोबर औद्योगिक क्षेत्रात सुद्धा भारताने प्रगती केली आहे.

भारतामध्ये अनेक उद्योगपतींनी शून्यापासून त्यांच्या उद्योगाची सुरुवात केली आणि त्या एका लहान स्केल पासून सुरु झालेल्या या व्यवसायाचं रूपांतर एक ब्रँड मध्ये केले. भारताला अयोद्योगिक क्षेत्रात बळकट बनविण्यासाठी भारतीय महिलांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. भारतीय महिला ज्यांनी एका व्यवसायाची सुरुवात केली आणि त्याच रूपांतर एका मोठ्या ब्रँड मध्ये केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भारतीय महिलांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी स्वतःचा वेगळा ब्रँड तयार करून त्याला एक वेगळी ओळख दिली.

१) शुगर कॉस्मॅटिक्स – विनिता सिंग

१ करोड रुपयांची जॉब ऑफर सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचं धाडस विनिता सिंग हिने २००७ साली स्वकारलं आणि भारतीय औद्योगिक क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. विनिता सिंग हिने २०१५ मध्ये शुगर कॉस्मॅटिक्स ही तिची सौंदर्य प्रसाधनांची कंपनी सुरु केली. आद्यस्थितीत या कंपनीचा वार्षिक उत्पन्न १०० कोटींपेक्षा जास्त आहे.

 

२) ममा अर्थ – गझल अलग

गझल अलग हिने तिचा पती वरून अलग सोबत सप्टेंबर २०१६ मध्ये ममा अर्थ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या किंवा ममा अर्थच्या ब्रँडच्या जन्माची कहाणी सुद्धा खप रंजक आहे. गजल अलग पहिल्यांदा आई होणार होती तेव्हा तिच्या बाळाची आणि सर्वच लहान मुलांची आईसारखी काळजी घेणारं नैसर्गिक प्रोडक्ट हवं या संकल्पनेतून ममा अर्थची सुरुवात झाली. महिला वर्षी २०२१ मध्ये या कंपनीच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा ३०० पार केला आहे.

 

३) बॅगिट – नीना लेखी

नीना लेखी यांनी सुरुतींच्या काळात म्हणजेच १९८५ सालात ६५ रुपये किमतीच्या बॅग्स बनवून विकायला सुरुवात केली आणि बघता बघता बॅगिट या ब्रँडची निर्मिती झाली. नीना लेखी या बॅगिट या ब्रँडच्या जन्मदात्या आहेत. या बॅग्स आणि ब्रँडचं वैशिष्ट्य म्हणेज या बॅग्स बनविताना कोणत्याही प्राण्याचा कातडीचा वापर केला जात नाही. २०१४ मध्ये PETA या संस्थेकडून बॅगिट या ब्रँडला बेस्ट ब्रँड ऑफ बॅग्स फॉर इंडियन वुमन्स हा पुरस्कार सुद्धा पटकावला.

 

४) बिबा – मीना बिंद्रा

वयाच्या ३९ व्या वर्षी एक माध्यम वर्गीय गृहिणी मीना बिंद्रा यांनी यांनी व्यवसायाला सुरुवात केली. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मीना बिंद्रा यांनी १९८३ मध्ये बँकेकडून ८००० रुपयांचे कर्ज घेत या नव्या व्यसायाला सुरुवात केली आणि समस्त भारतीय महिलांच्या पसंतीस उतरलेलया बिबा या ब्रँडची निर्मिती केली.

 

५) ग्लोबल देसी – अनिता डोंगरे

प्रसिद्ध फॅशन डिझाइनर अनिता डोंगरे यांच्या कल्पनेतून ग्लोबल देसी या ब्रँडची निर्मिती झाली. अस्सल भारतीय कलाकृती आणि पारंपरिकता, डिझाईनचा अनुभव ग्लोबल देसी या ब्रँडने भारतीय महिलांना दिला. अनिता डोंगरे यांनी १९९५ मध्ये बहीण मीरा आणि भाऊ मुकेश यांच्या जोडीने फॅशन हाऊसची स्थापना केली. ब्रँड च्या डिझाइनकडे अनिता डोंगरे विशेष लक्ष देतात.

हे ही वाचा – Independence Day 2022 : भारतातल्या ‘या’ 6 सौंदर्यवतींनी पटकावला मिस वर्ल्ड होण्याचा मान