पावसाचा जोर आता वाढू लागला आहे. कधी कधी पावसाच्या हलक्या सरी बरसतात तर कधी जोरदार पाऊस कोसळतो. या पावसामुळे जिमला जाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी व्यायाम करू शकता. घरच्या घरी कोणते व्यायाम करता येतील हे पाहूयात
पुढील व्यायाम तुम्ही करू शकता –
- पावसाळ्यात घरी सुर्यनमस्कार तूम्ही घालू शकता. सुर्यनमस्कार शरीर फिट ठेवण्याचा एक उत्तम पर्याय आहे.
- सुर्यनमस्काराव्यतिरीक्त तूम्ही घरी दोरीवरच्या उड्या मारू शकता. पावसामुळे जिमला जाणे शक्य होत नसेल तर अशा परिस्थितीत तुमच्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणे एक उत्तम अॅापश्न आहे.
- जर तुम्हाला नाचायला आवडत असेल तर तूम्ही डान्स देखील करू शकता. डान्स केल्याने तुमचा व्यायामही होईल आणि मूडही फ्रेस होईल.
- घरच्या घरी तुम्ही जंपिग जॅक सुद्धा करू शकता. जंपिग जॅक केल्याने वेटलॅास होण्यास नक्कीच मदत होते.
- पावसाळ्यात जर जिमला जाणे शक्य होत नसेल तर घरातील कामे करू शकता. जसे की, झाडू मारणे, फरशी पूसणे. घरातील कामामुळे शरीराची हालचाल होते म्हणजेच तुमचा एक प्रकारे व्यायाम होतो.
- घरच्या घरी तुम्ही योगा सुद्दा करू शकता. पहिल्यांदा योगा करणार असाल तर सोप्या योगांसनानी सुरूवात करा.
हेही पाहा :
Edited By – Chaitali Shinde