घरलाईफस्टाईलझटपट बनवा 'ब्रेड'चा टेस्टी उत्तपा

झटपट बनवा ‘ब्रेड’चा टेस्टी उत्तपा

Subscribe

रोज रोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन लहान मुलं कंटाळतात. यामुळे महिलांना नाश्त्यासाठी रोज काय बनवायचं असा प्रश्न पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हांला झटपट बनणारा ब्रेडचा उत्तपा ही रेसिपी सांगणार आहोत.

साहीत्य- ४ ब्रेड स्लाईस, अर्धा कप रवा, दोन मोठे चमचे मैदा, अर्धा कप दही, एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, दोन हिरव्या मिरची, अर्धी वाटी बारीक चिरलेला टॉमेटो, मीठ चवीनुसार, तेल प्रमाणानुसार, पाणी आवश्यकतेनुसार.

- Advertisement -

कृती- सर्वप्रथम ब्रेडची किनार कापून टाका. नंतर ब्रेडच्या स्लाईसवर पाणी शिंपडून ती कुस्करून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये ब्रेडचा लगदा घ्या. त्यात रवा, मीठ, दही टाका. नंतर भाज्या टाकून मिश्रण एकत्र करा.गरज वाटल्यास थोडं पाणी टाका. नंतर तवा गरम करून त्यावर गरमा गरम उत्तपे बनवा. सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर हे उत्तपे टेस्टी लागतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -