उपवासात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं गरजेच आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला उपवासाचे मोमोज कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 1 वाटी साबुदाणा
- 2 उकडलेले बटाटे
- 2 चमचे भाजून ठेचलेले शेंगदाणे
- 1-2 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा जिरे
- बारीक चिरलेलं आलं
- 1 चमचा तूप
- 1/2 चमचा लिंबाचा रस
- कोथिंबीर (बारीक चिरूलेली)
- खडे मीठ चवीनुसार
कृती :
- सर्वप्रथम साबुदाणा मोमोज बनवण्यासाठी साबुदाणा घेऊन तो धुवा आणि सुमारे 2 तास पाण्यात भिजवून ठेवा.
- यानंतर मिक्सरमध्ये साबुदाणा, मीठ, शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून चांगले बारीक करून घ्या.
- आता एका कढईत सारणासाठी तूप गरम करा. गरम तेलात जिरे टाकून चांगले तडतडून घ्या आता त्यात उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घालून चांगले परतून घ्या आणि त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला.
- आता मिळसलेल्या साबुदाण्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या आणि त्यात स्टफिंग टाकून मोमोच्या आकारात बनवा आणि उकडून घ्या.
- आता तयार साबुदाणा मोमोज सर्वांना सर्व्ह करा.
हेही वाचा :
नवरात्रीत ट्राय करा उपवासाची लुसलुशीत इडली
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -