घरलाईफस्टाईलInternational Day of Families 2021: कुटुंबाचे महत्त्व सांगणारा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस का...

International Day of Families 2021: कुटुंबाचे महत्त्व सांगणारा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस का साजरा केला जातो?

Subscribe

प्रत्येक वर्षी जगभरात १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा केला जातो. कुटुंबाचे महत्त्व सांगणारा हा दिवस जगभरातले लोक साजरा करतात. आजकालच्या धावपळीच्या काळात कुटुंबाचे महत्त्व अजूनच वाढत असते. समाजाची कल्पना कुटुंबाशिवाय अपूर्ण आहे. कुटुंबामुळे आपण समाजातील इतरांशी व्यक्तींशी जोडले जातो. कुटुंब फक्त आपले नातेचं सुधारत नाही तर ते आपल्याला प्रत्येक सुख दुःखात साथ सुद्धा देते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात कुटुंबाचे मानाचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या आधुनिक काळातही त्याचे महत्त्व थोडे सुद्धा कमी झाले नाही.

मात्र आपापसातील मदभेदांमुळे आधुनिक काळातील कुटुंब खूप लवकर एकमेकांरपासून लांब जाऊ लागले आहेत. अशावेळी कुटुंबाचे खास महत्त्व पटवून देणारा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा केला जातो. आजकाल नोकारीमुळे अनेक कुटुंबांना स्वतःच्या कुटुंबांपासून दूर रहावं लागतं. त्यामुळेच अनेक कुटुंब विस्कळीत होऊ लागले आहेत. खरंतर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश आजच्या तरूण पिढीला एकत्र कुटुंबाचे महत्त्व समजावे हा आहे.

- Advertisement -

 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस का साजरा केला जातो?

कुटुंबाचे महत्त्व सांगण्यासाठी १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्र जनरल असेंबली ने प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून प्रत्येक वर्षी १५ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी जगभरातील प्रत्येक लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी समजात जागरूकता पसरवली जाते. कुटुंब तूटू नये आणि त्यांच्यात एकता रहावी यासाठी आंतरराष्टीय साजरा केला जातो. कुटुंब आपल्याला भावनात्मक रूपाने मदत करते तसेच एकटेपणाने वाचवते. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाचे हेच महत्त्व आहे की तरूण पिढीला कुटुंबाचे महत्त्व कळावे आणि ते आपल्या कुटुंबियांपासून कधी लांब जाऊ नये.

- Advertisement -

 


हेही वाचा : Mothers Day 2022 : ‘मदर्स डे’ का साजरा केला जातो? काय आहे त्याचे महत्त्व?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -