घरलाईफस्टाईलInternational Men's Day 2022 : 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस?

International Men’s Day 2022 : 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस?

Subscribe

समाजातील विकासासाठी महिला आणि पुरुष दोघांचे योगदान महत्वाचे असते. जगभरात सध्या महिला सशक्तीकरण करण्याचे महत्व वाढत आहे. परंतु पुरुषांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी देखील जागरुक राहणं आवश्यक आहे. पुरुषांच्या मानसिक विकासासाठी आणि त्यांच्यातील सकारात्मक गुणांचे कौतुक करण्यासाठी प्रत्येक वर्षी जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. पुरुष कुटुंब, समाज आणि राष्ट्रातील एक महत्वाचा स्तंभ आहेत. त्यांच्या शिवाय सर्वकाही अपूर्ण आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाच्या निमित्ताने तरुण मुलं आणि पुरुषांना संघ, समाज, समुदाय, राष्ट्र, कुटुंब, लग्न आणि मुलांचा सांभाळ अशा विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी त्यांचे आभार मानत सन्मान केला जातात. सोबतच पुरुषांच्या मुद्द्यांवर देखील जागरुकता दर्शवली जाते.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस केव्हापासून साजरा केला जातो?
जगभरातील जवळपास 60 पेक्षा जास्त देशामध्ये 19 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

पुरुष दिवसाचा काय आहे इतिहास?
आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी सर्वात आधी 1923 मध्ये सुरु झाली. आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यासाठी 23 फेब्रुवारीला मागणी करण्यात आली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि माल्टाच्या संघटनांना पुरुष दिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. मात्र, 1995 पर्यंत खूप कमी संघटना या अयोजनाचा भाग बनले. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन बंद करण्यात आले.

- Advertisement -

1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबेगोमधील वेस्ट इंडीज विश्वविद्यालयातील इतिहास प्रोफेसर डॉ. जेरोम तिलक सिंह यांनी आपल्या वडीलांचा वाढदिवस 19 नोव्हेंबर साजरा केला. त्यावेळी पुरुषांच्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन करण्यात आलं. तेव्हापासून 19 नोव्हेंबर 2007 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात आलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -