Saturday, November 23, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीMens Health : पुरुषांना नकळत घेरतात हे आजार

Mens Health : पुरुषांना नकळत घेरतात हे आजार

Subscribe

महिला दिनाप्रमाणे दरवर्षी जागतिक पुरूष दिनही साजरा केला जातो. दरवर्षी 19 नोव्हेंबरला हा दिवस साजरा करण्यात येतो. अनेकांना तर जागतिक पुरूष दिन साजरा होतो , हे ठाऊकही नसते. खरं तर, महिला दिनाप्रमाणे पुरूष दिनही त्याच उत्साहाने साजरा करायला हवा. जागतिक पुरुष दिन पुरूषांचे स्वास्थ, समाजासाठी असणारे त्यांचे योगदान लक्षात ठेवण्यासाठी साजरा केला जातो. बदलत्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे पुरूषांनाही अनेक आजार होत आहेत. अनेकदा तर आपण एखाद्या आजाराच्या विळख्यात आहोत, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळेच आज आपण जागतिक पुरूष दिनानिमित्त पुरूषांना नकळतपणे कोणते आजार घेरत आहेत, पुरुषांमध्ये कोणते आजार वाढत आहेत, हे पाहणार आहोत.

पुरुषांमध्ये वाढणारे आजार –

हृदयविकाराचा झटका –

- Advertisement -

हृदयविकाराचा झटका पुरूषांच्या मृत्युचे कारण बनण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामागे अनेकदा स्मोकिंग, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शारीरिक हालचालिंचा अभाव अशी कारणे ठरत आहे.

डायबिटीस –

- Advertisement -

हल्ली बऱ्याचजणांना डायबिटीसची समस्या जाणवते. यातही पुरूषांमध्ये टाइप – 2 डायबिटीसचे प्रमाण अधिक दिसून येते. यामागे अनेकदा कौटूबिंक इतिहास हे कारण असते. याशिवाय लठ्ठपणा, व्यायाम न करणे यामुळे देखील पुरुषांमध्ये डायबिटीसची समस्या वाढत आहे.

कॅन्सर –

पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाणही वाढत आहे. यात फुफ्फुसाचा कॅन्सर, कोलन कॅन्सर, लिवरचे कॅन्सर अधिक वाढत आहे. त्यामुळे पुरुषांनी योग्य लाइफस्टाइल फॉलो करायला हवी.

मानसिक आरोग्य –

धकाधकीच्या आयुष्यात सर्वात मोठी ताणतणावाची समस्या बनत चालली आहे. यामागे कामाचे प्रेशर, कुटूंबाची जबाबदारी यासारखी कारणे असतात. त्यामुळे महिलांप्रमाणेच पुरूषांनीही त्याच्या स्वास्थ्याची काळजी घ्यायला हवी.

सेक्शुअल प्रॉब्लेम –

इरक्टेइल इन्फेक्शन सारख्या लैंगिक आरोग्याशी संबधित समस्या पुरूषांमध्ये वाढत आहेत. या समस्यांमुळे पुरूषांच्या शारीरिकच नाही तर आत्मविश्वासावरही परिणाम होत आहे. काही वेळा तर लैगिंक समस्यांमुळे वैवाहिक नातेही बिघडत आहे.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini