Women’s Day 2022: महिलांच्या पुरुषांकडून असतात ‘या’ 8 अपेक्षा

international womens day 2022 what do women want from men these 8 secrets will helpful
महिलांच्या पुरुषांकडून असतात 'या' 8 अपेक्षा

महिलांना समजून घेणे खूप कठीण असते, असे बऱ्याचं पुरुषांचे म्हणणे आहे. जगभरातील सर्व पुरुषांना या समस्येचा सामना करावा लागतो. कोणत्याही नातेसंबंधातील महिला पार्टनरला खुश ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करतात, ज्यानंतरही त्या इम्प्रेस होत नाहीत. कारण महिलांच्या मनात जे काही सुरू असते, ते पुरुष समजू शकत नाहीत. पुरुषांच्या तुलनेत महिला खूप रहस्यमय असतात. महिलाना असे वाटते की, आपल्या भावना न सांगता समोरच्या व्यक्तींला न बोलता समजल्या पाहिजेत. आज जागतिक महिला दिन आहे. या महिला दिनानिमित्ताने आम्ही तुम्हाला काही असे सिक्रेट्स सांगणार आहोत, जे प्रत्येक पुरुषाला माहित असणे गरजेचे आहे. जाणून घ्या या सिक्रेट्सबाबत

काळजी घेणे

जे व्यक्ती महिलांची काळजी घेतात, असे लोकं त्यांना खूप आवडतात. विशेष म्हणजे जेव्हा महिला कोणत्याही गोष्टीमुळे दुःखी असते. अशात तुम्ही महिला पार्टनर दुःखी असल्यामुळे तिला मिठीत घेऊन काळजी घेतली तर यामुळे महिलेला खूप चांगले वाटते. जेव्हा तुम्ही एखाद्याची जास्त काळजी घेता तेव्हा तो व्यक्ती जास्त प्रेम करू लागतो.

प्रेम व्यक्त करण्यासाठी करा काही खास

प्रत्येक महिलेला वाटते की, तिची प्रेम कहाणी एखाद्या फेयरी टेलप्रमाणे असावी. अशात बऱ्याच महिलांना प्रेम व्यक्त करण्याचा मॉर्डन पद्धत नाही तर ट्रेडिशनल पद्धत खूप आवडते. त्यांच्यासाठी काहीतरी खास करावे, असे महिलांना वाटते. त्यामुळे त्यांच्यासाठी काही सरप्राईज देखील प्लॅन करा. रोमँटिक डेटवर जाणे देखील महिलांना खूप आवडते. तुम्ही महिला पार्टनरला स्पेशल फील करण्यासाठी त्यांना प्रेमासंबंधित काही पुसत्क गिफ्ट करू शकता.

कौतुक करा

महिलांना आपले कौतुक ऐकणे खूप जास्त आवडते. त्यामुळे त्यांना कौतुक करणारे पुरुष खूप आवडतात.

आपल्या उणीवा लपवू नका

महिला पुरुषांना चेहऱ्यावरून पसंत करत नाहीत, तर त्यांचे मन कसे आहे, ते पाहतात. त्या विचारशील आणि संवदेनशील पुरुषावर प्रेम करतात. त्यामुळे महिला पार्टनर समोर कोणत्याही गोष्टी लपवू नका. जसे आहात, त्याचप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा.

वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका

महिलांना असे पुरुष जास्त आवडतात जे त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐकतात आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त ढवळाढवळ करत नाहीत. अनेक पुरुष आपल्या पार्टनरच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करत असतात, जे महिलांना अजिबात आवडत नाही. महिलांना स्वतःच्या समस्या स्वतःला सोडवू इच्छितात.

बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका

जर महिला पुरुषाला आपल्या मनातली गोष्ट सांगत असेल तर समोरच्या व्यक्तीने लक्षपूर्वक ऐका. महिलांना त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणारे व्यक्ती अजिबात आवडत नाहीत. याशिवाय महिलांना असे लोकं खूप आवडतात जे त्यांच्या समस्येतून मार्ग दाखवतील.

सतत भांडण करू नका

महिलांना जास्त भांडण करणारे पुरुष आवडत नाहीत. सतत कोणत्याही गोष्टीत भांडणारे आणि गैरसमज करून घेणाऱ्या पुरुष महिलांना आवडत नाहीत.

शारिरीक संबंध ठेवताना ही गोष्ट ध्यानात घ्या

कोणत्याही नातेसंबंधात आल्यानंतर पुरुषांना शारिरीक संबंध बनवण्याची खूप घाई असते. परंतु महिलांचे असे काही नसते. महिलांची शारिरीक संबंधाबाबतची पद्धत पुरुषांपेक्षा वेगळी असते. कोणासोबतही शारिरीक संबंध ठेवण्यापूर्वी महिलेची इच्छा असते की, त्यांच्या मनात समोर व्यक्तीप्रती प्रेम असावे.


हेही वाचा – Women’s Day 2022: महिला दिनी पत्नीच्या नावे उघडा स्पेशल अकाऊंट अन् दर महिना मिळवा 44,793 रुपये; जाणून घ्या कसे