घरलाईफस्टाईलInternational Women's Day : जाणून घ्या स्त्रियांच्या 'या' अधिकारांबाबत

International Women’s Day : जाणून घ्या स्त्रियांच्या ‘या’ अधिकारांबाबत

Subscribe

संपूर्ण जगभरात ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

आज जगभर स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत काम करत असतात. क्रिडा, कला अश्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी बाजी मारली आहे. संपूर्ण जगभरात ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे एकच भावना आहे ती म्हणजे स्त्रीचा सन्मान करणे. भारतासह अनेक देशात स्त्रियांसाठी कायदेशीर अधिकार बनवण्यात आले आहेत. पण ज्यांच्यासाठी हे अधिकार आहेत त्यांना या अधिकारांबाबतची काहीच माहीती नसते. यात समान वेतन अधिकार, घरगुती हिंसाचार अधिकार, मातृत्व संबंधी अधिकार आणि रात्री अटक न करण्याचा अधिकार , कामावर छळ होण्याच्या विरोधातील अधिकार, अश्या अनेक अधिकारांबाबत स्त्रियांना कल्पनाही नसते.

नेमके काय आहेत हे अधिकार

१) समान वेतन अधिकार – पुरुषांइतकेच महिलांनाही कामाच्या ठिकाणी समान वेतनाचा अधिकार आहे. भारतीय कामगार कायद्यानुसार, कोणत्याही ठिकाणी काम करताना पगाराच्या वेळी लिंगाच्या आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही.

- Advertisement -

२) घरगुती हिंसाचार अधिकार – महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी हा अधिकार तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत महिलेच्या घरी किंवासासरच्यांनी तिच्यावर काही हिंसाचार केला असेल तर ती त्याविरूद्ध गुन्हा दाखल करू शकते.

३) मातृत्व संबंधी अधिकार – या अधिकाराखाली जेव्हा एखादी महिला गर्भवती होते तेव्हा तिला २६ आठवड्यांची सुट्टी घेण्याचा अधिकार आहे. या कालावधीत महिलेच्या पगारामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. आणि ती पुन्हा काम सुरू करू शकते.

- Advertisement -

४) रात्री अटक न करण्याचा अधिकार – या कायद्यानुसार सूर्यास्तानंतर कोणताही पोलिस कोणत्याही महिलेस अटक करू शकत नाही.

५) कामावर छळ होण्याच्या विरोधातील अधिकार – कामाच्या ठीकाणी कायद्यानुसार, आपल्याकडे लैंगिक छळाविरूद्ध तक्रार करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.


हेही वाचा – Corona In Maharashtra: कोरोनाचा कहर! राज्यातील बाधितांची एकूण संख्या २२ लाख पार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -