International Yoga Day 2022 : तुम्हाला वजन कमी करायचेय? ‘ही’ ५ योगासने करतील मदत

आजच्या काळात वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात, पण तरीही कोणताही परिणाम होत नाही. मात्र आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल सांगणार आहोत, जी रोज केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. या दिवशी जगभरात योगाशी संबंधित अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. देश-विदेशातील लोकही या दिवशी योगा करतात. योग हा भारताने संपूर्ण जगाला दिलेला अमूल्य वारसा आहे. निरोगी शरीरासाठी योगा खूप महत्वाचा आहे. योगाच्या माध्यमातून तुमच्या शरीरात अनेक चांगले बदल दिसून येतात. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी योगासन खूप चांगले मानले जाते.

आजच्या काळात वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात, पण तरीही कोणताही परिणाम होत नाही. मात्र आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल सांगणार आहोत, जी रोज केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी योग चांगला?

योगामुळे वजन कमी होण्यास मदत होते की नाही यावर लोकांची वेगवेगळी मते आहेत. जेव्हा तुम्ही योगासनासोबत सकस आहार घेता तेव्हा वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासोबतच तुमचे मन आणि शरीरही निरोगी राहते. वजन कमी करायचे असेल तर योगासनांसोबतच सकस आहार घेणे आवश्यक आहे.

वजन कमी करण्यासाठीची योगासने

चतुरंग दंडासन / प्लँक पोझ

चतुरंग दंडासन हे तुमचे पोट मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हे योगासन जितके सोपे वाटते तितकेच त्याचे फायदेही आहेत. जेव्हा तुम्ही या आसनात असता तेव्हाच तुम्हाला तुमच्या पोटाच्या स्नायूंमध्ये त्याची तीव्रता जाणवू लागते.

विरभद्रासन (योद्धा पोझ) 

जर तुम्हाला तुमच्या मांड्या आणि खांदे मजबूत करायचे असतील तर हे आसन उपयुक्त आहे. या आसनामुळे तुमचा मागचा भाग, पाय आणि हात टोनिंगसह तुमचे संतुलन सुधारते. हे तुमचे पोट टोन करण्यास देखील मदत करते.

त्रिकोनासन (त्रिकोण मुद्रा)

त्रिकोनासन आसन पचन सुधारण्यास तसेच ओटीपोटात आणि कंबरेवर साठलेली चरबी कमी करण्यास मदत करते. हे आसन  संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह वाढवते आणि सुधारते. हे आसन केल्याने कमरेच्या आजूबाजूच्या भागातून चरबी निघून जाते. त्रिकोनासनमुळे संतुलन आणि एकाग्रता देखील सुधारते.

अधो मुख श्वानासन ( डाऊनवर्ड डॉग पोज)

हे आसन केल्याने पोटाच्या खालच्या स्नायूंना बळकटी मिळते आणि हे मणक्यालाही आधार मिळतो. या आसनामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. तसेच एकाग्रता आणि रक्ताभिसरण सुधारते.

सर्वांगासन (खांद्यावर उभे राहण्याचे आसन)

सर्वांगासन केल्याने पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला शक्तीही मिळते. तसेच हे आसन चयापचय वाढवण्यास तसेच थायरॉईडची पातळी संतुलित ठेवण्यासाठी ओळखले जाते. हे आसन पोटाचे स्नायू आणि पाय मजबूत करते. तसेच सर्वांगासनामुळे श्वसन प्रणाली सुधारते.