इंटरव्ह्यू ही उमेदवारासाठी कठीण प्रक्रिया असू शकते, ज्या दरम्यान तुम्ही तुमच्या कारकीर्दीमध्ये मिळवलेल्या सर्व गोष्टी मुलाखतीमध्ये मांडत असता. यामध्ये तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व आणि काम करण्याच्या पद्धती याविषयी सांगायचे असते. इंटरव्ह्यू दरम्यान तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित असता पण व्हर्च्यअल इंटरव्ह्यू म्हणजे ऑनलाइन मुलाखत. यासाठी तुम्हाला कोणत्यातरी उपकरणाद्वारे ऑनलाइन कनेक्ट व्हावे लागते. यामध्ये तुम्ही मोबाईल, टॅब, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरद्वारे मुलाखतीसाठी सहभागी होऊ शकता.
व्हर्च्युअल इंटरव्ह्यू म्हणजे काय ?
व्हर्च्युअल इंटरव्ह्यू ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मुलाखतकार आणि उमेदवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर वापरून एकमेकांशी संवाद साधतात . व्हर्च्युअल इंटरव्ह्यू हा सहसा फोन इंटरव्ह्यूच्या आधी किंवा नंतर घेतला जातो.
व्हर्च्युअल इंटरव्ह्यू फायदेशीर का ठरू शकतो ?
व्हर्च्युअल इंटरव्ह्यूमुळे उमेदवाराचा प्रवास खर्च वाचतो. ही पद्धत आर्थिकदृष्ट्या चांगली ठरू शकते.
व्हर्च्युअल मुलाखती कधीही आणि कोणत्याही ठिकाणाहून घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे उमेदवार आणि मुलाखतकाराचा वेळ वाचू शकतो.
तुम्ही ऑनलाइन कनेक्ट झाल्यामुळे व्हर्च्युअल इंटरव्ह्यू पर्यावरणपूरक ठरू शकतो.
व्हर्च्यु्अल इंटरव्ह्यूसाठी, तुम्हाला संगणक, वेबकॅम, मायक्रोफोन, इंटरनेट कनेक्शन आणि व्हर्च्युअल मीटिंग सॉफ्टवेअरची आवश्यकता असते.
व्हर्च्यु्अल इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला चांगल्या दर्जाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरची आवश्यकता असते.
तुमच्याकडे संगणक किंवा लॅपटॉप, मायक्रोफोन आणि वेबकॅम असल्यास व्हर्च्युअल मुलाखतीला उपस्थित राहणे सोपे होते.
तुमच्याकडे असलेले यंत्र योग्य प्रकारे काम करत असल्याची खात्री करून घ्यावी. नाहीतर मुलाखतीदरम्यान तुमच्या मुलाखतीत अडथळे निर्माण होऊ शकतात.
खरंतर व्हर्च्युअल इंटरव्ह्यू हा दोन किंवा अधिक लोकांमधील संवादाचा एक प्रकार आहे, मुलाखत घेणारा आणि उमेदवार हे व्हिडिओ कॉल, व्हॉईस कॉल किंवा ऑनलाइन चॅट यांसारख्या अंतरावर असतात.
विशिष्ट उमेदवारांची निवड करण्याची ही एक सोपी प्रक्रिया असते, परंतु व्हर्च्युअल इंटरव्ह्यू हे बिझनेस टॉक , शिक्षण किंवा सामाजिक संवाद यासारख्या इतर विषयांबद्दल देखील असू शकतात. व्हर्च्युअल इंटरव्ह्यूची तयारी करून आणि सराव करून, तुम्ही सकारात्मक छाप पाडू शकता आणि नोकरी मिळवण्याची शक्यता वाढवू शकता.
व्हर्च्यु्अल इंटरव्ह्यू दरम्यान काय करू नये?
तुमच्या मुलाखतीदरम्यान खाऊ किंवा पिऊ नका. यामुळे मुलाखतीत तुमचा वाईट प्रभाव इतरांवर पडू शकतो.
तुमच्या मुलाखतींसाठी आधीपासूनच सराव करा. याद्वारे तुम्ही तुमची उत्तरे आत्मविश्वासाने देऊ शकता.
तुमच्या मुलाखतीदरम्यान तुमच्या फोनवर राहू नका. संभाषणादरम्यान सौम्य भाषेचा वापर करा.
तुमच्या मुलाखतीदरम्यान सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या मुलाखतीनंतर आभार मानणारा एक ई-मेल पाठवा. तुमची चांगली छाप पाडण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो.
तुमच्या मुलाखतीसाठी शांत आणि प्रकाश असणाऱ्या खोलीत बसा. विशेषतः पार्श्वभूमीत आवाज किंवा कोणताही त्रास टाळण्याचा प्रयत्न करा.
तुमचा कॅमेरा तुमच्या चेहऱ्यासमोर धरा. तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली पाहणे मुलाखतकाराला सोपे गेले पाहिजे.
स्वतःला चांगले प्रेझेंट करा. स्वच्छ कपडे घाला, केस नीट विंचरा. हलकासा मेकअप करा.
तुमच्या मुलाखतीसाठी तयार रहा, खोटे बोलणे टाळा. कंपनी आणि पोस्टबद्दल सखोल संशोधन करा, कंपनीचा इतिहास, ध्येय, दृष्टी आणि उद्दिष्टे जाणून घ्या.
बोलताना तुमच्या मुलाखतकाराकडे पाहा. इतर गोष्टींकडे पाहणे टाळा जेणेकरून त्यांना कळेल की तुम्ही त्यांचे ऐकत आहात आणि तुम्हाला संभाषणात रस आहे.
तुमचे उत्तर स्पष्ट आणि लहान ठेवा. मुलाखतकाराचे पूर्ण ऐकल्यानंतरच उत्तर द्या.
तुम्हाला तांत्रिक अडचणी येत असतील तर प्रत्येक वेळी बोलण्यापूर्वी मुलाखत घेणाऱ्याला तुमचे म्हणणे ऐकू येते का ते तपासा.
हेही वाचा : Gut Health : पोट साफ होत नाही?
Edited By – Tanvi Gundaye