पिरियड्स अनियमित असतील तर करु नका दुर्लक्ष, असू शकते ‘या’ आजारांची सुरुवात

सामान्य मासिक पाळी २ ते ८ दिवसांची असते परंतु काही महिलांची पाळी ४ दिवसांची देखील असते. मासिक पाळीच्या दरम्यान अनेक मुली आणि महिलांमध्ये बरेच हार्मोनल आणि शारिरीक बदल होत असतात. बऱ्याचदा या बदलांकडे मुली किंवा महिला दुर्लक्ष करतात.

irregular menstrual cycles periods tied to increased risk of nonalcoholic fatty liver disease
पिरियड्स अनियमित असतील तर करु नका दुर्लक्ष, असू शकते 'या' आजारांची सुरुवात

पिरियड्स किंवा ज्याला आपण मासिक पाळी असे म्हणतो ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्टी आहे. स्त्रीच्या आयुष्यातील एक सामान्य प्राकृतिक जैविक प्रक्रिया आहे. साधारणत: १२व्या वर्षापासून मुलीला पाळी येण्यास सुरुवात होते. जवळपास वयाच्या ४५-५५ पर्यंत मासिक पाळी संपते. या काळाला मेनोपॉज असे म्हणतात. प्रत्येक स्त्रीचे मासिक पाळीचे चक्र वेगळे असते. सामान्य मासिक पाळी २ ते ८ दिवसांची असते परंतु काही महिलांची पाळी ४ दिवसांची देखील असते. मासिक पाळीच्या दरम्यान अनेक मुली आणि महिलांमध्ये बरेच हार्मोनल आणि शारिरीक बदल होत असतात. बऱ्याचदा या बदलांकडे मुली किंवा महिला दुर्लक्ष करतात. परंतु याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. एका रिसर्चनुसार, मासिक पाळी अनियमित असणे हे लिव्हरशी जोडलेल्या आजाराशी संबंधीत असू शकतात.

 

४० वर्षाहून कमी वयाच्या महिलांवर करण्यात आला अभ्यास

रिसर्चनुसार, अनियमित मासिक पाळीमुळे लिव्हरशी संबंधित आजाराची जोखीम वाढवू शकते. यू. एस. ऑफिस ऑन व्हुमेन हेल्थ नुसार, जर मासिक पाळी २४ ते ३८ दिवसात येत असेल तर ती नियमित मासिक पाळी आहे.

४० वर्षांहून कमी वय असलेल्या ७२ हजार ९२ अनियमित मासिक पाळी येणाऱ्या महिलांवर एक अभ्यास करण्यात आला.  असामान्य मासिक पाळी येणाऱ्या महिलांमध्ये नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिसीज असण्याची शक्यता आहे. याचे प्रमाण हे ४९ टक्के इतके आहे.

हार्मोन्स बॅलेंन्स बिघडल्याने लिव्हरवर परिणाम

ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाचे डायटिशियन आणि ओव्हिसिटी रिसर्चर डॉ. दिमित्रियोस कॉटॉकिडिस यांनी म्हटले आहे की, हार्मोन्स बँलेन्सचा स्रीयांच्या लिव्हरवर खरंच परिणाम होतो का हे पाहण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. अभ्यासात असे निदर्शनास आले की, सेक्स हार्मोन्स एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरोनचे असमान्य स्तर नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर या रोगाची जोखीम वाढवते.

डॉ. कॉटॉकिडिस यांच्या म्हणण्यानुसार, फॅटी लिव्हरशी जोडलेला आजार रोखण्यासाठी मासिक पाळी चक्रात महिलांसाठी कोणताही अचूक उपाय नाही. परंतु अशा स्त्रियांनी त्यांच्या लाइफ स्टाइलमध्ये बदल केले तर हा धोका कमी होऊ शकतो. त्यासाठी पुढील गोष्टी फॉलो करा.

  • वजन कमी करा
  • दारू पिऊ नका
  • सिगरेट ओढू नका

हेही वाचा – पांंढऱ्या केसांमुळे त्रस्त असाल तर, तुळस आणि आवळ्याचे हे उपाय नक्की करून बघा