हल्ली बऱ्याच महिलांना पिरियड वेळेवर न येणे ही समस्या जाणवते. पिरीयड अनियमिततेमुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवत आहेत. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी पिरीयड वेळेवर येणे गरजेचे आहे. साधारणपणे, या पिरीयड चक्रामागे 28 दिवसांचे अंतर असते. पण, हा कालावधी मागे पुढे झाल्यास पिरीयड अनियमितता समजली जाते. यामागे तशी अनेक कारणे असू शकतात. जसे की, ताणतणाव, हार्मोनल संतुलन, वजनात बदल ही कारणे असु शकतात. अशा परिस्थितीत तु्म्ही पिरियड नियमित होण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
दालचिनी –
मसाल्यातील दालचिनी पिरियड नियमित करण्यासाठी फायदेशीर ठरते. दालचिनीच्या गुणधर्मामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे दालचिनीचे पाणी तुम्ही प्यायला हवे. या उपायाने पिरियड नियमित होऊ शकतात.
हळद –
हळद इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सच्या पातळीचे व्यवस्थापन करते. खरं तर, हळदीतल्या एमेनेगॉगमुळे पिरीयड वेळेवर येण्यास मदत होते. त्यामुळे पिरीयड वेळेवर येत नसतील तर तुम्ही हळदीचे पाणी प्यायला हवे.
अननस –
मासिक पाळी नियमित होण्यासाठी तुम्ही अननस खाऊ शकता. अननसमध्ये ब्रोमेलेन भरपूर प्रमाणात असते, जे गर्भाशयासाठी आणि पिरीयडच्या समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
आले –
पिरीयड क्रॅम्प्स आणि अनियमित पिरीयड येण्यासाठी आलं तुम्हाला उपयोगी ठरू शकते. यातील दाह विरोधी गुणधर्म अनियमित पिरीयडवर प्रभावी ठरतात. त्यामुळे आहारात आल्याचा नक्की समावेश करा.
व्यायाम –
नियमित व्यायाम केल्याने तुमचे पिरीयडचे चक्र व्यवस्थित होऊ शकते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पिरीयडचे चक्र नियमित होण्यासाठी अननसाचे सेवन करू शकता.
वजन महत्त्वाचे –
मासिक पाळी अनियमित होण्यामागे वजन हे कारण सुद्धा असू शकते. कारण जर तुमचे वजन गरजेपेक्षा जास्त किंवा कमी असेल तर पिरीयड अनियमित होऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला पौष्टीक आहार, योगासने आणि व्यायाम याच्या साहाय्याने पिरीयड नियमित करता येऊ शकते.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde