Monday, April 15, 2024
घरमानिनीHealthतुम्हालाही irregular periods येतात का?

तुम्हालाही irregular periods येतात का?

Subscribe

प्रत्येक महिलांना पीरियड्सच्या प्रक्रियेतून जावे लागते. या दरम्यान काही महिलांना पोटात दुखणे, अंग दुखणे अशा समस्या येतात. परंतु काही महिला अशा असतात ज्यांना नियमितपणे पीरियड्स येत नाही. या मागे काही कारणं असू शकतात. (Irregular periods)

खरंतर मेंस्ट्रुअल सायकल ही 28 दिवसांची असते. जर यामध्ये काही बदल झाले तर समजून जा पीरियड्सची सायकल अनियमित होत आहे. अशातच डॉक्टरांना न विचारता गोळ्या घेण्याची काहीच गरज नाही. केवळ तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. तर पाहूयात तज्ञ या बद्दल काय सांगतात.

- Advertisement -

हेल्दी फॅट खा
पीरियड्स अनियमित होण्यामागील कारणं असे की, अनहेल्दी फूड. जर हेल्दी फूड खाल्ले नाही तर काही प्रकारच्या शारिरीक समस्या निर्माण होऊ शकतात. हेल्दी फूडचा अर्थ असा नव्हे की, केवळ वसा युक्त पदार्थांचे सेवन करणे. बटर, तूप, बदाम अशा पदार्थांमधून सुद्धा आपल्याला हेल्दी फॅट्स मिळतात. या व्यतिरिक्त मोसमी फळांना सुद्धा आपल्य डाएटचा हिस्सा बनवला पाहिजे. भोपळ्याच्या बियांचे सेवन करु शकता.

नियमित व्यायाम करा
हेल्दी राहण्यासाठी केवळ खाणंपिणंच नव्हे तर नियमित एक्सरसाइज करणे सुद्धा फार महत्वाचे आहे. जर पीरियड्स रेग्युरल येत नसतील तर योगाची काही आसने यावेळी कामी येतील. केवळ 5 मिनिट तरी हे आसन कराल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही चक्की चलनासन, नावासन, कपासन, गोमुखासन, भुजंगासन करु शकता.

- Advertisement -

शतपावली करा
ही अत्यंत जुनी प्रणाली आहे. शतपावलीचा अर्थ असा होतो की, जेवणानंतर थोडावेळ तरी चालणे. जर डाइजेशन सिस्टिमला उत्तम ठेवायचे असेल तर शतपावली जरुर करा.

रात्री 10 पूर्वी झोपा
बहुतांश आजार हे आपली झोप पूर्ण न झाल्यामुळे होतात. जर तुम्ही वेळेवर झोपला नाहीत तर तुमचे हार्मोन असंतुलित होतील. यामुळे तुमच्या झोपण्याची एक वेळ ठरवा. तज्ञांनुसार, रात्री 10 पर्यंत झोपले पाहिजे. हे एकच दिवस करु नका तर आपल्या रुटीनमध्ये याचा समावेश करा.

सकाळी वॉकला जा
सकाळची सुर्याची किरणं आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सुर्याच्या किरणांमुळे आपल्याला व्हिटॅमिन-डी मिळते. अशातच आपण सकाळी थोडावेळ सुर्याच्या किरणांच्या संपर्कात राहिलो तर आरोग्याला भरपूर फायदे होऊ शकतात.

जर तुम्हाला इर्रेग्युलर पीरियड्सची समस्या आहे तर शरिराला मसाज केल्यानंतर सुर्याची किरणं अंगावर पडू द्या. शरिरातील कामे सुरळीत सुरु राहण्यासाठी आणि शरिराला व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शिअम मिळण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा सुर्य किरणांच्या संपर्कात या.


हेही वाचा- पीरियड्स दरम्यान अधिक थकवा येतो? करा हे काम

- Advertisment -

Manini