भारतीय संस्कृतीमध्ये लोक जमिनीवर मांडी घालून जेवण करणं पसंत करतात. परंतु मागील अनेक वर्षांपासून ही पद्धत हळूहळू कमी होऊ लागली आहे. अलीकडे अनेकजण डाइनिंग टेबलवर बसून जेवणं करणं पसंत करतात. शिवाय लग्न-समारंभामध्ये किंवा पार्टीमध्ये लोक नेहमीच उभं राहून जेवण करणं पसंत करतात. मात्र, आरोग्याच्या दृष्टीकोणातून पाहायला गेलं तर टेबलावर बसून जेवणं आणि उभं राहून जेवण या दोन्ही पद्धती खूप चुकीच्या आहेत.
मांडी घालून जेवणं करण्याचे फायदेशीर?
आयुर्वेदानुसार, जर आपण योग्य पद्धतीने बसून जेवण केलं नाही तर त्याचे नीट पचन देखील होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना देखील करावा लागू शकतो. डायनींग टेबलवर बसून जेवण करणे आरामदायी, सोयीस्कर असले तरी त्यामुळे शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता अधिक असते. जमिनीवर बसून जेवल्याने अनेक लहान सहान आजार आपल्यापासून दूर राहतात. कारण, जमिनीवर मांडी घालून आपण जेवायला बसतो, तेव्हा आपण एका विशिष्ट योगासन घालून बसलेलो असतो. या आसनाला सुखासन म्हणतात. सुखासन पद्मासनाचे एक रूप आहे. पद्मासनामुळे जे फायदे होतात ते सर्व फायदे सुखासनामुळे होतात.
- जेवणावर राहिल नियंत्रण
जमिनीवर जेवायला बसल्यावर सर्व लक्ष जेवणावर राहते. अशावेळी तुम्ही जास्त जेवण खाण्यापासून वाचाल. जेवण जास्त खाणं देखील आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसते. गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने तुमचे वजन देखील वाढू शकते.
- शरीर आणि मन शांत होते
मांडी घालून जेवायला बसल्याने शरीरासोबतच मन शांत राहते. असे मानले जाते की या आसनात बसल्याने शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. हे मणक्याचे सरळ करते आणि खांद्याच्या स्नायूंना आराम देते.
- जेवणावर राहिल लक्ष
खाली जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाकडे पूर्ण लक्ष राहते. त्यामुळे ते योग्य पद्धतीने चावून खाल्ले जाते आणि सोबतच यामुळे शारिरीकदृष्ट्या आरोग्य देखील चांगले राहते.
- सांधेदुखी पासून होईल बचाव
जमिनीवर बसून जेवण केल्याने पाठीचा कणा आणि मान दोन्ही सरळ राहते. ज्यामुळे शरीर आणि डोक्याला आराम मिळतो.
- रक्ताभिसरण सुधारते
मांडी घालून बसल्याने पायांमधील रक्ताभिसरण कमी होते आणि अतिरिक्त रक्त हृदयाद्वारे इतर अवयवांपर्यंत पोहोचते, त्यामुळे पचनासाठी आवश्यक क्रिया वाढतात.
हेही वाचा :