Monday, March 17, 2025
HomeमानिनीBeautySkin Care : मेकअप प्रॉडक्ट इतरांसोबत शेअर करताय? वाचा दुष्परिणाम

Skin Care : मेकअप प्रॉडक्ट इतरांसोबत शेअर करताय? वाचा दुष्परिणाम

Subscribe

मेकअप करायला कोणत्याही स्त्रीला आवडते. समारंभानुसार मेकअपचा प्रकार बदलण्यात येतो. सण-समारंभासाठी ट्रेडिशनल, पार्टीसाठी क्लासी तर रोजसाठी हलका मेकअप करण्यात येतो. आपल्यापैंकी अनेक जणींना मेकअप प्रॉडक्ट शेअर करण्याची सवय असते. पण, तुम्हाला माहित आहे का? तज्ञांच्या मते, एकमेकांसोबत चुकूनही मेकअप प्रॉडक्ट शेअर करू नये. मेकअप प्रॉडक्ट शेअर करणे त्वचेसाठी घातक ठरू शकते. यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात, मेकअप प्रॉडक्ट इतरांसोबत शेअर केल्याने त्वचेवर काय दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

  • मेकअप प्रॉडक्ट इतरांसोबत शेअर केल्याने चेहऱ्यावर बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्याने पिंपल्स, मुरुम आणि त्वचेचे इन्फेक्शन होण्यास सुरूवात होते.
  • मस्कारा, आयलायनर यांसारखे डोळ्यांचे मेकअप प्रॉडक्ट शेअर केल्यास डोळ्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो.
  • लिपस्टिक, लिप ग्लॉस शेअर केल्याने ओठांवर फोड येणे, जळजळ होणे, साल निघून जाणे, ओठ ड्राय होणे अशा समस्या उद्भवतात.
  • लिपस्टिक, लिप ग्लॉस शेअर केल्याने ओठांचे इन्फेक्शन होऊ शकते.
  • खरं तर, प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे इतरांसाठी योग्य असणारे मेकअप प्रॉडक्ट तुमच्यासाठी एलर्जीचे कारण ठरू शकते.
  • विविध मेकअप प्रॉडक्टमध्ये केमिकल्स वेगवेगळे असतात. या केमिकल्समुळे त्वचा लाल होणे, खाज येणे आणि त्वचेला सूज येणे अशा समस्या सुरू होतात. त्यामुळे मेकअप प्रॉडक्ट खरेदी करताना आणि इतरांचे वापरताना खबरदारी घ्यावी.
  • इतरांचे मेकअप प्रॉडक्ट वापरल्याने पिग्मेंटेशनची समस्या सुरू होते.
  • त्वचेवर वारंवार डाग येत असतील तर यामागे मेकअप प्रॉडक्ट शेअर करणे हे कारण असू शकते.
  • जर एखाद्याची स्किन ड्राय असेल आणि ते मेकअप प्रॉडक्ट तुम्ही तेलकट त्वचेसाठी वापरलेत तर त्रासदायक ठरू शकते.
  • मेकअप करताना मेकअप प्रॉडक्ट स्वत:चे वापरावेत आणि कोणाशी शेअरही करु नयेत.
  • मेकअप प्रॉडक्ट स्वच्छ ठेवावेत. अस्वच्छ मेकअप प्रॉडक्ट वापरल्याने त्वचेवर इन्फेक्शन होऊ शकते.
  • वारंवार मेकअप प्रॉडक्टची एक्सपायरी डेट असते ती तपासावी.

 

 

 

हेही पाहा –

Manini