शेंगदाणे खाल्यानंतर पाणी पिणे योग्य आहे की नाही याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. काहीजण असे मानतात की शेंगदाणे खाल्यावर लगेच पाणी पिल्यास पचनास अडथळा येतो आणि खोकला किंवा गळ्यात खरखर होऊ शकते. तर काहीजण म्हणतात की याचा कोणताही वैज्ञानिक कारण नाही. शेंगदाणे हे चरबीयुक्त आणि प्रथिनयुक्त पदार्थ आहेत, त्यामुळे त्यांचे पचन तुलनेने हळूहळू होते. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात शेंगदाणे खाल्यानंतर पाणी पिणे योग्य आहे कि नाही.
आयुर्वेदाच्या मते शेंगदाणे खाल्यानंतर लगेच पाणी पिणे शक्यतो टाळावे.
पचन प्रक्रिया
शेंगदाणे तेलकट आणि उष्ण प्रकृतीचे असतात. त्यानंतर लगेच पाणी पिल्यास पचन क्रिया मंदावू शकते आणि अपचन, गॅस किंवा सूज यांसारख्या समस्या होऊ शकतात.
घशात चिकटपणा
शेंगदाणे चावून खाताना तोंडात काहीसा चिकटपणा येतो. त्यानंतर थंड पाणी प्यायल्यास तो अधिक वाढू शकतो आणि घशात खवखव जाणवू शकते.
आयुर्वेदानुसार
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, शेंगदाणे उष्ण असतात, तर पाणी विशेषतः थंड शरीरावर विरुद्ध परिणाम करू शकते, ज्यामुळे सर्दी-खोकला किंवा अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेंगदाणे खाल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
पाणी कधी प्यावे?
- शेंगदाणे खाल्यानंतर किमान 30-40 मिनिटांनी पाणी प्यावे.
- जर खूप तहान लागली असेल, तर कोमट पाणी किंवा गरम पाणी घेणे फायदेशीर ठरू शकते.
अपवाद
- काही अपवाद देखील आहे, जर कोरडे शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणे खाल्ले असतील आणि घसा कोरडा किंवा खराब होईल.
- आजारी पडू शकतो.
हेही वाचा : Health Tips : मेनोपॉज दरम्यान आहारात करा या पदार्थांचा समावेश
Edited By : Prachi Manjrekar