घरात पाळीव प्राणी ठेवण्याचा ट्रेंड हा नवीन नाही आहे.आपल्या देशात ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. पूर्वी लोक घरी गायी, म्हशी, शेळ्या इत्यादी पाळत असत. पण बदलत्या काळामुळे आणि पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे लोकांनी घरात कुत्रे आणि मांजरी पाळायला सुरुवात केली आहे. बरेच लोक प्राणी प्रेमी असल्यामुळे त्यांना घरात कुत्रा किंवा मांजर पाळायला आवडतात. घरी पाळीव प्राणी असणे हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. पाळीव प्राण्यांमुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंददायी राहते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून प्राण्यांना घरात बांधून ठेवणे योग्य आहे का ते आज आपण या लेखातून जाणून घेऊयात.
पाळीव प्राण्यांना बांधून ठेवणे योग्य आहे का?
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून प्राण्यांना घरात बांधून ठेवणे चांगले मानले जात नाही.घरी पाळीव प्राणी असणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु जर त्यांना बांधून ठेवले तर मुक्तपणे हालचाल करू शकत नाही. अशाने एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जी घरात ही पसरली जाते.
आर्थिक समस्या
ज्योतिषशास्त्राप्रमाणे घरात कुत्रा पाळल्याने तुमचे शनि आणि राहू दोष कमी होऊ शकतात. परंतु, जर कुत्रा घरात रडत असेल किंवा अस्वस्थ राहिला तर ग्रह दोष देखील वाढू शकतात. अशा परिस्थितीत, कुत्र्याला जास्त काळ बांधून ठेवू नये असा सल्ला दिला जातो. यामागचं कारण म्हणजे जर कुत्रा रडत असेल किंवा त्याला अस्वस्थ वाटत असेल ग्रहदोषच उद्भवत नाहीतर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
अशांती निर्माण होणे
घरात पाळीव प्राणी ठेवणे शुभ मानले जाते. परंतु त्यांना घरात बांधून ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. जर पाळीव प्राणी तणावग्रस्त असेल तर कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक शांतीवरही परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे कुटुंबात भांडणे आणि मतभेद वाढू शकतात.
आरोग्यावर परिणाम
घरातील पाळीव प्राण्यांना जर बांधून ठेवले नाहीतर ते खूप आनंदी आणि चांगल्या मूडमध्ये असतात. जर त्यांना पूर्ण दिवस बांधून ठेवले तर ते निराश आणि अस्वस्थ असतात. दुखी असल्याने ते जेवण देखील करत नाही अशाने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो.
हेही वाचा : Pet Care : उन्हाळ्यात तुमच्या सोन्या, मोती, ब्रुनोची अशी घ्या काळजी
Edited By : Prachi Manjrekar