बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर लगेच झोपायची सवय असते. जेवणानंतर लगेच झोपणे हे अनेकांच्या दैनंदिन सवयीचा भाग आहे. परंतु आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य आहे का ? याचा विचार करणे देखील अत्यंत गरजेचं आहे. आज आपण जाणून घेऊयात जेवणानंतर लगेच झोपणे योग्य आहे का
पचनावर परिणाम
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अन्नाचे पचन नीट होत नाही, ज्यामुळे अॅसिडिटी, गॅस आणि अपचन होऊ शकते.झोपल्याने शरीरातील चयापचय क्रिया देखील मंदावते आणि अनेक समस्या निर्माण होतात.
वजन वाढण्याचा धोका
खाण्यानंतर लगेच झोपल्याने वजनवाढ होण्याची शक्यता अधिक असते. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीरातील कॅलरी जलद बर्न होत नाही.त्यामुळे कॅलरीज चरबीच्या स्वरूपात जमा होऊ लागतात.शरीराच्या चयापचयाच्या क्रियेतही याचा परिणाम होऊ शकतो.
अॅसिडचा त्रास
खाण्यानंतर लगेच झोपल्याने अॅसिडचा त्रास होऊ शकतो. ऍसिड रिफ्लक्समुळे छातीत जळजळ, अपचन, अस्वस्थता, फुगणे आणि परिपूर्णतेची भावना निर्माण होते.
थकवा आणि जडपणा
जेवणानंतर लगेच झोपल्यास शरीर सुस्त आणि जड वाटू शकते.
२-३ तासांनी झोपा
जेवणानंतर किमान २-३ तासांनी झोपा यामुळे अन्नाचे देखील नीट पचन होईल.
फेऱ्या मारणे
जेवणानंतर १०-१५ मिनिटे फेऱ्या मारणे हे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.
आजार
जेवल्यानंतर लगेच झोप काढल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. तुम्हाला अनेक शारीरिक आजारांचा सामना करावा लागू शकतो.
हेही वाचा : Hiccups Remedies : उचकीने हैराण झालात? हे करा उपाय
Edited By : Prachi Manjrekar