Thursday, March 27, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : कॉफी बरोबर ही 12 औषधं घेणे धोकादायक

Health Tips : कॉफी बरोबर ही 12 औषधं घेणे धोकादायक

Subscribe

आजारी असल्यावर वेळोवेळी औषधे-गोळ्या घेण्यात येतात. आजारपणामुळे तोंडाला चव नसल्याने औषधे-गोळ्या पाण्याऐवजी फळांचा ज्यूस किंवा चहा-कॉफीसोबत घेतल्या जातात. आजारपणामुळे नकोसे झालेले असताना कॉफी प्यायल्याने औषधे-गोळ्या पोटातही जातात आणि फ्रेशही वाटते. पण, तज्ञांच्या मते कॉफी बरोबर काही औषधे घेणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कॉफीसोबत ही औषधे घेतल्याने शरीरावर औषधांचा परिणाम होत नाही. त्यामुळे आजच्या लेखात जाणून घेऊयात कॉफी बरोबर कोणती औषध घेणे धोकादायक ठरू शकते.

सर्दी-खोकल्याचे OTC औषध –

जेव्हा सर्दी-खोकला होतो तेव्हा काहीतरी गरमा-गरम खाण्या पिण्याचा सल्ला दिला जातो. गरम पिण्यास सांगितले आहे तर काही जण सर्दी-खोकल्याची औषधे कॉफीसोबत घेतात, जे खरं तर आरोग्याच्यादृष्टीने योग्य नाही. कारण या औषधांमध्ये सर्दी कमी आणि नाकातील सूज कमी होण्याचे औषधे असतात तर याउलट कॉफी सर्दी-खोकल्याची समस्या आणखी तीव्र करू शकते. त्यामुळे कॉफीसोबत ही औषधे घेऊ नयेत.

नैराश्यविरोधी गोळ्या (Antidepressant pills)

जर तुम्ही नैराश्यविरोधी गोळ्या घेत असाल तर कॉफीसोबत घेणे टाळायला हवे. कारण अशी औषधे कॅफिनच्या पचनावर परिणाम करणारी असतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.

डायबिटीसची औषधे (Diabetes)

कॉफीमुळे रक्तातील साखर वाढते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीने कॉफीसोबत औषणे पिऊ नयेत.

ऍटीबायोटिक्स (Antibiotics)

तुम्ही कोणत्याही प्रकारचे ऍटीबायोटिक्स घेत असाल तर कॉफीसोबत घेऊ नयेत. कारण या औषधातील घटक कॅफिनच्या पचनात अडथळे आणू शकतात. ज्याचा थेट परिणाम हृ्दयाच्या गतीवर होऊ शकतो.

रक्त पातळ करणारी औषधे (Anticoagulant)

कॉफीसोबत चुकूनही रक्त पातळ करणारी औषधे घेऊ नयेत. कारण आरोग्याच्यादृष्टीने हे योग्य मानली जाते. यामुळे अतिरिक्त ब्लीडिंगचा धोका निर्माण होतो.

बीपीची औषधे (Blood Pressure)

बीपीच्या गोळ्या कॉफीसोबत घेऊ नये असे तज्ञ सांगतात.

थायरॉइडची औषधे (Thyroid)

थायरॉइडची औषधे कॉफीसोबत घेऊ नये. कॉफीमुळे 30% पर्यत शोषण कमी होऊ शकते. ज्यामुळे औषधांचा परिणाम शरीरावर होत नाही.

ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis)

कॉफीतील कॅफिनच्या परिणामामुळे कॅल्शियमचे सेवन आणि कॅल्शियम कमी होणे यात असंतुलन निर्माण होते. त्यामुळे ही औषधे कॉफीसोबत घेणे टाळा.

एटीसाइकोटिक (Antipsychotic) , अल्झायमर (Alzheimer), अस्थमा (Asthma), एडीएचडी (Hyperactivity disorder) च्या औषधे-गोळ्यांसोबत कॉफी घेऊ नये.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini