लिंबाचा वापर केवळ अन्न आणि आरोग्यासाठी केला जात नाही, तर बहुतेक महिला त्यांचे केस आणि त्वचा मजबूत करण्यासाठी देखील याचा वापर करतात. बऱ्याचदा आपण हेअरमास्क किंवा हेअरपॅक बनवतात त्यामध्ये लिंबूचा समावेश करतो. लिंबाच्या रसात असलेले पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स केसांना निरोगी आणि चमकदार बनवतात. परंतु केसांसाठी लिंबू वापरणे याेग्य आहे का ? ते आज या लेखातून जाणून घेऊयात.
सौंदर्य तज्ञांच्या मते
प्रत्येक महिलेला तिचे केस लांब, जाड आणि चमकदार असावेत असे नेहमी वाटत असते. आपली कंबरेखालील केस वाढवण्यासाठी महिला अनेक नवीन उत्पादने वापरतात आणि काही घरगुती उपाय देखील करतात. परंतु अनेक उपाय करून देखील केस वाढत नाहीत. लिंबू योग्य प्रकारे कसा वापरायचा ते जाणून घेऊयात.
केसांवर लिंबाचा वापर
लिंबू केसांसाठी आणि टाळूसाठी देखील खूप फायदेशीर आहे.लिंबू वापरून तुम्ही कोंड्याची समस्या कमी करू शकता. यासाठी तुम्ही लिंबाचा वापर योग्य पद्धतीने करणे अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही लिंबू थेट तुमच्या टाळूवर लावला तर ते तुमच्या टाळूला नुकसान पोहोचवू शकते आणि केस गळण्याची समस्या देखील वाढू शकते.
हेअर ऑइलसह लिंबूचा रस
लिंबाचा योग्य वापर करण्यासाठी, तुम्ही अर्ध्या वाटी पाण्यात लिंबू मिसळून केसांना लावू शकता आणि टाळूची मालिश देखील करू शकता. याशिवाय, तुम्ही अर्ध्या वाटी केसांच्या तेलात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून तुमच्या टाळूवर मालिश करून केसांना लावू शकता. असे केल्याने तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
लिंबाचा रस वापरण्यापूर्वी, तुमचे केस चांगले धुवा आणि केस वाळवल्यानंतर काही वेळानंतरच केसांवर लिंबाचा रस लावा. तुम्हाला फक्त लिंबाचा रस तेल किंवा पाण्यात मिसळून ३० मिनिटे तुमच्या टाळूवर ठेवावा लागेल.त्यानंतर तुम्ही तुमचे केस धुवू शकता. यामुळे तुमचे केस चमकदार आणि कोंडामुक्त होऊ शकतात. जर तुमची टाळू कोरडी असेल किंवा तुम्हाला त्वचेची कोणतीही समस्या असेल तर लिंबू वापरणे टाळू शकता.
केसांसाठी लिंबू वापरणे योग्य आहे. लिंबाच्या रसात असलेले पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स केसांना निरोगी आणि चमकदार बनवतात. लिंबाचा रस वापरून केसांच्या समस्यांवर उपचार करता येतात.
हेही वाचा : Beauty Tips : ऑयली स्किनसाठी होममेड फेस मिस्ट
Edited By : Prachi Manjrekar