उन्हाळ्यात अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात. या ऋतूत मिळणारी फळे बहुतांश ही रसाळ असतात. लिची हे उन्हाळ्यात मिळणारे गोड आणि रसाळ फळ आहे. उन्हाळ्यात लिची खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण, उन्हाळ्यात लिची खाताना त्याची योग्य वेळ आणि पद्धत माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी खाल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, लिची रिकाम्या पोटी खाऊ नये.
रिकाम्या पोटी लिची खाणे आरोग्यासाठी धोकादायक
- लिचीमध्ये हायपोग्लयसिन ए आणि मिथिलिन सायक्लो प्रोपिल ग्लायसिन नावाचे कंपाउंड आढळतात. जे शरीरातील ग्लुकोज तयार होण्याची प्रक्रिया मदत करतात.
- जर तुम्ही रात्रीपासून काही खाल्ले नसेल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी पूर्वीपेक्षा कमी होईल, अशा स्थितीत तुम्ही रिकाम्या पोटी भरपूर प्रमाणात लिची खाल्लीत तर रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी होऊ शकते, त्यामुळे रिकाम्या पोटी लिची खाणे टाळावे.
- हे दोन्ही कंपाउंड्स कच्च्या लिचीमध्ये जास्त प्रमाणात आणि पिकलेल्या लिचीमध्ये कमी प्रमाणात असतात.
- अशावेळी, पिकलेली लिची खाल्याने शरीराला कोणतेही हानी होत नाही.
- लिचीमध्ये भरपूर्ण पाणी असते. उन्हाळ्यात हे खाल्ल्याने डिहायड्रेशन होत नाही.
लिची कशी खावी ?
- लिची उष्ण असते त्यामुळे ते खाण्यापूर्वी 1 ते 2 तास पाण्यात भिजवून ठेवावी.
- बऱ्याच वेळा लिचीच्या भोवती किडे असतात.त्यामुळे लिची खाताना ते काळजीपूर्वक तपासून खावी.
- लिची खाण्यापूर्वी नीट धुवून घ्यावी.
- लिची कधीही रिकाम्या पोटी किंवा रात्री उशिरा खाऊ नये.
- हिरवी अर्थात कच्ची लिची खाऊ नये.
- लिची जास्त प्रमाणात खाऊ नये. तुम्ही दिवसातून 7 ते 8 लिची खाऊ शकता.
- लिची ग्राम असल्याने लहान मुलांना एकाचवेळी 3 ते 4 लिची देऊ नयेत.
हेही पाहा : Vitamin C Fruits : उन्हाळ्यात ही फळे खाल्याने व्हिटॅमिन सी ची कमतरता भासणार नाही I Summer Care Tips
Edited By – Chaitali Shinde