Wednesday, February 12, 2025
HomeमानिनीHealth Tips : झोपेच्या गोळ्या घेणे सुरक्षित आहे का?

Health Tips : झोपेच्या गोळ्या घेणे सुरक्षित आहे का?

Subscribe

आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण खूप वाढत चालला आहे. घरगुती समस्या असो किंवा कामाचा ताण प्रत्येकजण या समस्येने ग्रासला आहे. वर्क लोड, आर्थिक अडचणी, वैयक्तिक समस्या हे सर्व मानसिक आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण आहे. या सर्व कारणांमुळे बऱ्याचदा आपल्याला झोप लागत नाही. झोप येण्यासाठी आपण झोपेच्या गोळ्या घेतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? या गोळ्या घेणे सुरक्षित आहे की नाही. आज आपण जाणून घेऊयात झोपेच्या गोळ्या घेणे सुरक्षित आहे का?

रोज झोपेच्या गोळ्या घेतल्यास काय होते?

रोज झोपेच्या गोळ्या घेतल्याने शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. रोज झोपेच्या गोळ्या घेतल्याने पुढील समस्या उद्भवू शकतात

व्यसनाधीनता

Is it safe to take sleeping pillsनियमित झोपेच्या गोळ्यांचं सेवन केल्याने या गोळ्यांची सवय लागू शकते. तसेच या गोळ्यांशिवाय झोप देखील येणार नाही. शरीर त्या गोळ्यांवर अवलंबून राहील.

सहनशीलता

सुरुवातीला कमी डोसने झोप येते. परंतु नंतर त्याचा परिणाम कमी होतो. जास्त डोस घेतल्यानंतरच झोप येते.

मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम

दीर्घकाळ झोपेच्या गोळ्या घेतल्याने मेंदूच्या स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते.

झोपेच्या नैसर्गिक पद्धतीत अडथळा

या गोळ्या वारंवार घेतल्याने नैसर्गिकरित्या झोप येत नाही.

झोपेच्या गोळ्या कशा घ्याव्यात सुरक्षितता

डॉक्टरांचा सल्ला घ्या

झोपेच्या गोळ्या किंवा कोणत्याही इतर गोळ्या या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घ्या.

निर्धारित डोस घ्या

जास्त प्रमाणात गोळ्या घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेला डोसच घ्या.

मद्य किंवा इतर औषधांसोबत टाळा

अल्कोहोल, तंबाखू किंवा इतर औषधांसोबत झोपेच्या गोळ्या घेतल्यास धोकादायक परिणाम होऊ शकतात.

या गोळ्या झाेपेच्या गाेळया काेणी घेऊ नये

  • गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिला
  • लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती
  • श्वसनासंबंधी समस्या असलेल्या व्यक्ती
  • मानसिक आरोग्याने ग्रस्त असलेल्या महिलांनी

हेही वाचा : Yoga After Meal : जेवल्यानंतर कोणत्या आसनात बसावे?


Edited By : Prachi Manjrekar

Manini